मराठी

मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी घेतला स्‍वच्‍छ भारत अभियानाचा आढावा 

अमरावती दि १२ – मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍वच्‍छ भारत अभियान अंतर्गत स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2021 या संदर्भात सर्व जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक व स्‍वास्‍थ निरीक्षकांची आढावा बैठक दिनांक 11 डिसेंबर,2020 रोजी मनपा कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये घेण्‍यात आली होती.
स्‍वच्‍छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत राबविण्‍यात येणारे स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2021 संपुष्‍टात येण्‍याचा अंतिम कालावधी 31 मार्च,2021 हा आहे. या वेळीचे सर्वेक्षण हे मार्च 2021 पर्यंत सुरु राहील. याकरिता सर्वेक्षण अंतर्गत राबविण्‍यात येणा-या उपक्रमांची पुरेपुर माहिती मिळावी या अनुषंगाने सर्वांनी स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2021 ची मार्गदर्शिका वाचणे आवश्‍यक आहे. आपल्‍या शहराची स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2021 चे प्रत्‍यक्ष निरीक्षण हे दिनांक 1 मार्च,2020 ते 21 मार्च,2020 च्‍या दरम्‍यान होईल. तत्‍पुर्वी म्‍हणजेच माहे डिसेंबर,2020 अथवा जानेवारी 2021 च्‍या दरम्‍यान आपल्‍या शहराचे ओ.डी.एफ. पुर्नतपासणी/वॉटर व 3/5 स्‍टार चे सर्वेक्षण होईल. या अनुषंगाने आपण सर्वांनी सदर तिन्‍ही सर्वेक्षण चे प्रत्‍यक्ष निरीक्षण करीता गांभीर्याने तयारीला लागावे. यावेळी या सर्वेक्षण मध्‍ये काही बदल झालेले आहेत जसे सिटीझन फिडबॅक चा कालावधी 4 जानेवारी ते 28 मार्च,2021 प्रत्‍यक्ष निरीक्षण करतेवेळी सिटीझन फिडबॅक घेण्‍याचा कालावधी 1 मार्च ते 31 मार्च,2021 पर्यंत स्‍वच्‍छता अॅप कालावधी 28 फेब्रुवारी,2021 पर्यंत सर्वेक्षण उपक्रमांमध्‍ये नागरिकांचा सहभाग दर्शविणे 15 फेब्रुवारी,2021 पर्यंत स्‍वच्‍छता रँकिंग ची अंतिम तारीख 31 जानेवारी,2021 तसेच नवकल्‍पना 31 जानेवारी,2021 पर्यंत संपुष्‍टात आणावयाचे आहे.
तरीही स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2021 चा कालावधी लक्षात घेता सर्व जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक व स्‍वास्‍थ निरीक्षकांना आपल्‍या अधिनस्‍त झोन/प्रभागामध्‍ये मनपा शिक्षण विभाग, एन.यु.एल.एम. महिला बचत गट, गृहनिर्माण सोसायटी, प्रभागातील सर्व नागरिक व तसेच संबंधीत पदाधिकारी/सन्‍मा.नगरसेवक यांना सहभागी करुन  जबाबदारी निहाय नमुद केल्‍यानुसार दिनांक 15 जानेवारी,2021 पर्यंत संपुर्ण उपक्रम राबवायचे आहेत व स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2021 चे कागदपत्र तयार करणेकरिता सदर सर्व उपक्रमांचे अहवाल जिओ टॅग फोटो व व्हिडीओ रेकॉर्डिंग च्‍या स्‍वरुपात सादर करायचे आहेत.
100 टक्‍के दैनंदिन वर्गीकृत कचरा संकलन करणे, प्रभागनिहाय प्रत्‍येकी दोन खतनिर्मिती प्रकल्‍प उभारणे, दैनंदिन व्‍यावसायिक, खाजगी क्षेत्रात रात्रकालीन साफ सफाई, नेहमी कचरा दिसणा-या ठिकाणाचे सौंदर्यीकरण, शेणखत उचलणे, नाल्‍यांची नियमित साफ सफाई करणे. सफाई कामगारांना गणवेश, गमबुट, जॅकेट्स, हातमोजे, मास्‍क वाटप करणे. दर महिन्‍याला उत्‍कृष्‍ठ सफाई कामगार/वाहनचालक यांना सन्‍मानित करणे, सफाई कर्मचा-यांकरिता प्रशिक्षण आयोजित करणे, प्‍लास्टिक बंदी मोहीम राबविणे, बांधकाम व विध्‍वंसक कचरा उचलणे व दंडात्‍मक कार्यवाही करणे, ई-लर्निंग कोर्सेस करणे. सामुदायिक, सार्वजनिक शौचालये व मुता-या साफ सफाई करणे. ओडीएफ व स्‍टार रेटिंग प्रोटोकॉल नुसार प्रभाग निहाय तयारी करणे. सिटीझन फिडबॅक अंतर्गत नागरिकांना प्रत्‍यक्ष निरीक्षण करतेवेळी विचारण्‍यात येणा-या प्रश्‍नांची सकारात्‍मक उत्‍तरे देण्‍याकरिता प्रभागनिहाय किमान 35 घरे स्‍वच्‍छतेबाबत प्रश्‍नांची सकारात्‍मक उत्‍तरे देण्‍याकरिता तयार ठेवावीत. पदाधिकारी, सन्‍माननीय नगरसेवक धार्मिक वक्‍ते, प्रभागातील नागरिक, बचत गट, अपार्टमेंट्स, एनजीओ यांना सहभागी करुन स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2021 बाबत जनजागृती करणे, स्‍वच्‍छता अभियान राबविणे. स्‍वच्‍छतेबाबत ऑडिओ जिंगल, शॉर्ट फिल्‍म तयार करणे, पथनाट्य, सांस्‍कृतिक कार्यक्रम आयोजित करावे. मनपा शाळामध्‍ये प्रभागातील परिसरामध्‍ये  रांगोळी, चित्रकला, पोस्‍टर पेंटींग, भिंतीचित्रे पेंटींग स्‍पर्धा आयोजित करुन प्रमाणपत्र वाटप करणे. नेहमी स्‍वच्‍छतेप्रती जागरुक असणारे प्रभागातील नागरिक (महिला व पुरुष) यांना स्‍वच्‍छता चॅम्पियन म्‍हणुन यांचा सत्‍कार करणे. स्‍वच्छता अॅपवर नियमित प्रत्‍येक महिन्‍याला 647 टाकणे, सदर तक्रारी नियमित वोटेड अप करणे, सकारात्‍मक फिडबॅक दर्शविणे.
तरी संबंधीतांनी विहित वेळेत कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल वेळोवेळी सादर करावा. सदर बाबतीत आपणाकडुन कोणत्‍याही प्रकारची हयगय आढळून आल्‍यास आपणाविरुध्‍द प्रशासकीय कार्यवाही करण्‍यात येईल. याबाबत सर्वांनी नोंद घ्‍यावी व सर्वांनी गांभीर्याने आपले स्‍तरावर जबाबदारी निहाय उपक्रम राबवावेत अश्या स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीत वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ. सिमा नेताम, सर्व जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक, सर्व स्‍वास्‍थ निरीक्षक, स्‍वच्‍छ भारत अभियान अमरावती शहर समन्‍वयक डॉ. श्‍वेता बोके उपस्थित होते.

Related Articles

Back to top button