मराठी

मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी घेतला स्‍वच्‍छता कंत्राटदाराच्‍या कामाचा आढावा

अमरावती/दि.२२  – गुरुवार दिनांक 22 मार्च,2020 रोजी मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांचे अध्‍यक्षतेखाली स्‍वच्‍छता विभागातील कंत्राटदारांची बैठक मनपा कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत आयुक्‍तांनी सर्व कंत्राटदारांना सुचित केले की, स्‍वच्‍छ सर्वेक्षणाच्‍या नियमावलीप्रमाणे सर्वांनी काम करावे. अमरावती शहरात कुठेही गटार साचलेले राहू नये याची दक्षता घ्‍यावी. नागरीकांनी तुबलेल्‍या गटाराचे जीओ टॅग फोटो संबंधीत कंत्राटदारांना पाठवावे. एखादी तक्रार दुरुस्‍त होत नसल्‍यास त्‍वरीत वरीष्‍ठांना सुचित करावे तसेच ज्‍या सुचना दिल्‍या जाईल त्‍याचे तंतोतंत पालन करा. शहरातील प्‍लास्‍टीक उचलून घ्‍यावे, सार्वजनिक ठिकाणे स्‍वच्‍छ करुन ठेवावी. फॉगींग गुरुवार व शुक्रवार करण्‍यात यावी. सफाई कंत्राटदाराने सर्व साहित्‍य कामगारांना पुरवावे. त्‍यांनी यावेळी सर्व कंत्राटदारांना स्‍पष्‍ट सुचना दिल्‍या की, प्रत्‍येकाने चांगली कामगिरी करणे गरजेचे असून सर्वांनी नियमाप्रमाणे काम करावे. शहर पुर्णपणे स्‍वच्‍छ करण्‍यासाठी प्रत्‍येकाने काम करणे गरजेचे आहे.
आयुक्‍तांनी यावेळी सांगितले की, प्रभागातून तक्रारी आल्‍यास संबंधीत कंत्राटदाराला दंड करण्‍यात येईल. प्रत्‍येकाने प्रामाणिक पणे काम करणे अपेक्षित आहे. महानगरपालिका व कंत्राटदार यामध्‍ये जे करारनामा झाला आहे त्‍याप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे. कामगाराच्‍या खात्‍यात पैसे टाकल्‍याचा पुरावा देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दर महिन्‍याला बिल टाकणे अनिवार्य राहिल. डेंग्‍युचे रुग्‍ण ज्‍या प्रभागात निघत आहे त्‍या कंत्राटदाराला कारणेदाखवा नोटीस बजावण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहे. आयुक्‍तांनी कंत्राटदारांना मनपाचे महत्‍वाचे घटक असल्‍याने तुमची जबाबदारी मोठी आहे. कंत्राटदाराकडे असणारी यंत्रसामुग्री प्रशासनाकडुन येणा-या काळात तपासण्‍यात येणार आहे. ओला-सुका कचरा वेगवेगळा ज्‍या प्रभागात करण्‍यात येत असेल त्‍या प्रभागातील कंत्राटदाराचा सत्‍कार करावा व जे करत नसेल त्‍यांना दंड करण्‍याच्‍या सुचना यावेळी आयुक्‍तांनी दिल्‍या. प्रत्‍येक प्रभागात रुटमॅप लावण्‍यात यावा तसेच स्‍वच्‍छ सर्वेक्षणाबाबत आवश्‍यक कार्यवाही करावी. कचरा इतरत्र टाकणा-यावर दंडात्‍मक कार्यवाही होणे अपेक्षित आहे. शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यावरील कचरा उचलणे गरजेचे असून यापुढे कचरा मुख्‍य रस्‍त्‍यावर दिल्‍यास संबंधीतांना तात्‍काळ विचारणा करुन आवश्‍यकती कार्यवाही करण्‍यात येईल. जी.पी.एस. चालु करणे बंधनकारक आहे. शहरातील बांधकाम साहित्‍य अस्‍ताव्‍यस्‍त असल्‍यास त्‍याला दंड करण्‍यात यावा. सद्या सनासुदीचे दिवस सुरु असून शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निघत आहे. त्‍याचे संपुर्ण नियोजन करुन शहरात कुठेही कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्‍यावी. सार्वजनिक संडास साफ करण्‍यात यावे. ग्रास कटरद्वारे शहरातील गवत कटाई करावी. नागरिकांमध्‍ये स्‍वच्‍छतेबाबत जनजागृती करावी.

नागरिकांनी तक्रार करण्‍याकरीता श्री साई सुशिक्षीत बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.1 शेगावं रहाटगाव मोबाईल नं.8888550000, श्री विजय बालकिसनजी गंगण प्रभाग क्र.2 पीडीएमसी मोबाईल नं.8788433400, श्री संजय रामरावजी हिरपुरकर प्रभाग क्र.3 नवसारी मोबाईल नं.7350033332, सुशिक्षीत बेरोजगारांची सागर नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.4 जमिल कॉलनी मोबाईल क्र.9130985077, श्री श्‍याम बबनराव शिनगारे प्रभाग क्र.5 महेंद्र कॉलनी मोबाईल नं.7887706163, ईश्‍वर मेहतर माग. सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.6 विलास नगर-मोरबाग मोबाईल नं.9225324307, गोविंदा सफाई कामगार नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.7 जवाहर स्‍टेडीयम मोबाईल नं.9834448420, मैत्री सुशिक्षीत बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.8 जोग स्‍टेडीयम मोबाईल नं.8329052796, राष्‍ट्रमाता जिजाऊ महिला बचत गट प्रभाग क्र.9 एसआरपीएफ वडाळी मोबाईल नं.9403081580, सम्‍यक नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.10 बेनोडा मोबाईल नं.9850076549, मैत्री सुशिक्षीत बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.11 फ्रेजरपुरा मोबाईल नं.8329052796, विकास गंगा नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.12 रुक्मिणीनगर मोबाईल नं.9325630225, बेरोजगारांची श्रमिक नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.13 अंबापेठ मोबाईल नं.9922310062, अफसर खॉ मिया खॉ प्रभाग क्र.14 बुधवारा मोबाईल नं.9326445869, मो.ईरशाद अब्‍दुल सत्‍तार प्रभाग क्र.15 छायानगर-पठाणपुरा मोबाईल नं.7972428071, श्री नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.16 अलिमनगर मोबाईल नं.7020357816, सुशिक्षीत बेरोजगारांची जगदंबा मरीमाता सफाई कामगार सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.17 गडगडेश्‍वर मोबाईल नं.8308081818, श्री संत वारकरी महिला बचत गट बडनेरा प्रभाग क्र.18 राजापेठ मोबाईल नं.9766243540, श्री साई सुशिक्षीत बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.19 साईनगर मोबाईल नं.9370153233, सुशिक्षीत बेरोजगार नवकिरण नागरिक सेवा संस्‍था प्रभाग क्र.20 सुतगिरणी मोबाईल नं.7720853000, बैरमबाबा सेवाभावी सफाई कामगार सेवा सहकारी संस्‍था बडनेरा प्रभाग क्र.21 जुनीवस्‍ती बडनेरा मोबाईल नं.9823292153, शारदा महिला बचत गट प्रभाग क्र.22 नवीवस्‍ती बडनेरा मोबाईल नं.8459679894, बेरोजगारांची महाराष्‍ट्र नागरिक सेवा सहकारी संस्‍था प्रभाग क्र.23 संपुर्ण बाजार मोबाईल नं.9325116139 यांच्‍याशी संपर्क साधावे असे आवाहन महानगरपालिकेकडुन करण्‍यात आले आहे.
या बैठकीत सहाय्यक आयुक्‍त (मुख्‍यालय) नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ. सिमा नैताम, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, स्‍वास्‍थ अधिक्षक अरुण तिजारे, सर्व सफाई कामगार कंत्राटदार उपस्थित होते.

Related Articles

Back to top button