वरुड/दि. ९ – तालुक्यातील वाई शेतशिवारामध्ये शेतामध्ये राहात असलेल्या ७० वर्षीय वृध्द महिलेचा अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादीची सासू रमिया दलसू यूवनाते (७०) ही शेतातील खोपडीत राहते तिचे सोबत माझी लहान मुलगी काजल ही राहत होती. घटनेच्या आधल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता माझी मुलगी काजल हिला मी घरी घेवून गेली. घटनेच्या दिवशी माझे पती माझे सासुला घ्यायला सकाळी ७ वाजता शेतात गेले असता त्याच वेळेला जिजाजी देवराव युवनाते यांचा फोन आला की, मांझी सासु रमीया दलसु युवनाते हिच्या डोक्यावर भारी हत्याराने मारुन तिचा खून करण्यात आला.
कलावंती यूवनाते हिचा खुन कोणी आणि कशासाठी केला? हे एक कोडे असून त्याचा तपास करुन आरोपीचा शोध घेण्याची जबाबदारी आता शेंदुरजनाघाट पोलिसांवर येवुन ठेपली आहे.
याप्रकरणी कलावंती देवराव यूवनाते (३७) रा.पेंडुनी (मध्यप्रदेश) यांचे फिर्यादीवरुन शेंदुरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक शुभांगी थोरात करीत आहेत.