मराठी
माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ !
परिवारातील अबाल, वृद्धांची काळजी घ्या-आ. प्रताप दादा अडसड
नांदगाव खंडेश्वर/दि. १७ – नांदगाव खंडेश्वर तालुक्यात माझे कुटुंब माझी, जबाबदारी या मोहिमेला पंचायत समिती स्थित सभागृहात मा. आमदार प्रतापदादा अडसड यांचे शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना शपथ देण्यात आली की, कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वतः माझ्या कुटुंबात , परिसरात लोकांना मास्क लावणे, आप आप साथ २ मीटर चे अंतर ठेवणे. साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टी करिता प्रेरीत करणार.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पंचायत समिती सभापती रिठे ताई, उपसभापती राजीव घोडे, नगराध्यक्ष संजय पोफळे, तहसीलदार पियुष चिवंडे , आरोग्य अधिकारी इंगळे साहेब, बि.डि.ओ. खेडकर साहेब, अंगद पाटील ठाकरे, सचिन रिठे, हरिश्चंद्र खंडाळकर, राजेश पाठक, घनश्याम सारडा, नवल खीची, निकेत ब्राह्मणवाडे, यांचेसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पंचायत समिती, नगरपंचायत आरोग्य विभाग, महसूल विभागाचे कर्मचारी कार्यक्रमाला हजर राहिले.
कोरोणा चा संसर्ग कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्याकरिता माझे कुटुंब ,माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. नागरिकांनी दुखणे अंगावर काढू नये कोरोना संबंधित लक्षण जाणवत असेल तर तात्काळ तपासणी करून घ्यावी . उपचार होऊन बरे व्हावे कोरोणा च्या काळात सर्वांची सद्भावनेने वागावे , कोरोणा युद्धाशी सन्मानाने वागण्याचे आवाहन आमदार प्रताप दादा अडसड यांनी केले.