नागपुर – महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. मुंढे यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द तुकाराम मुंढे यांनी स्वतःहून व्टिट करून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मंगळवारी (दि २५) सकाळी दिली आहे. मात्र त्यांना अन्य कोणतेही लक्षण नाही. तरीही जे कोणी तुकाराम मुंढे यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतः पुढे येऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन मुंढे यांनी स्वतः केले आहे. सुरवातीपासूनच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंढे यांनी नागपुरात युध्दस्तरावर परिस्थिती हाताळणी केली आहे. त्यामुळे पुढील चौदा दिवस मुंढे गृहविलगीकरणात राहून घरूनच काम करणार असल्याचे त्यांनी ट्विट मध्ये म्हंटलं आहे. कोरोनाची नागपुरातील परिस्थिती सुध्दा ते घरून काम करून हाताळतील.