मराठी

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत प्रभागनिहाय आरक्षण सोडत १० ला

सोडतीनंतर निवडणूक चर्चा रंगणार

नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी/४ नोव्हेंबर  – नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतचा पहिला कार्यकाळ संपुष्टात येत असून पुढील निवडणुकीकरीता शहरातील १७ प्रभागाचे जातनिहाय उमेदवाराचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १० नोव्हेंबरला निवडणूक विभागाद्वारे प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीनंतरच ख:या अर्थाने येणा:या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
पक्षा-पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आपल्या प्रभागात आरक्षणात जागा कोणाकडे जाणार याकडे नजर लावून बसले असून एससी, एसटी, ओबीसी, ओपन संवर्गातील महिला की पुरुष याची निश्चिती झाल्यानंतरच शहराचे प्रत्येक प्रभागातील पक्षाचे छोटे-मोठे कार्यकर्ते कामास लागणार असून यात सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना व विरोधातील काँग्रेस पक्ष आघाडीवर असेल, तसेच वंचित बहुजन आघाडी पक्ष व इतर स्थानिक गट सुद्धा निवडणुकीची तयारी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
आरक्षण सोडतीपूर्वी नगर पंचायत निवडणुकीचा ज्वर पाहावयास मिळत असून, महिलांकरीता जागा गेली तर? इतर मागास वर्गाचे आरक्षण मिळाले तर? असे तर्क वितर्क बांधून उमेदवार शोधाचे कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच आयाराम-गयाराम, इकडे जमले नाही, तर त्या गटात जमेल का याची चाचपणी करीत आहे. मात्र, एवढ्या सा:या गडबडीतून सामान्य मतदार दूरच असून सर्व कार्यकर्ते व नेत्यांचे भविष्य तोच ठरविणार एवढे मात्र खरे.

Related Articles

Back to top button