मराठी
भारतीय महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन संपन्न
अमरावती/दि.२६ – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस ऑनलाइन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.श्रीकांत पाटील संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. प्रमुख अतिथी डॉ. मंदा नांदुरकर अमरावती जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत विघे, डॉ. सुमेधा वरघट,प्रा. स्नेहा जोशी डॉ.पल्लवी सिंग उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आराधना वैद्यां यांनी नी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत विघे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस 24 सप्टेंबर 1969 पासून तर 2020 मध्ये 51 व्या वर्षामध्ये राष्ट्रीय सेवा योजना पदार्पण केले आहे राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या संधी प्राप्त करते ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष* महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना मानवी जीवनाला स्वच्छतेचे महत्त्व देते आणि स्वच्छतेचे महत्त्व स्वतः सोबतच शहर सुद्धा स्वच्छ करण्यासाठी उपयोग केला पाहिजे असा संदेश दिला , पुढे म्हणाल्या की ,कोरोनाच्या काळामध्ये स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा विचार कृतीत आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
*कार्यक्रमाचे वक्ते डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले की* ,राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी ,कौशल्य विकसित केले पाहिजे, सोबतच गाडगेबाबांची दशसूत्री, पंजाबराव देशमुख यांचा विचार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचारांचा प्रसार करणे गरजेचे आहे .राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वतः स्वयंपूर्ण कसा होईल, कौशल्य विकसित कसे होईल, यासाठी त्यांच्यामध्ये सामाजिक संस्कार कसा रुजवता येईल, या दृष्टीने महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असते. कौशल्य विकासाच्या संधीचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत महत्त्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या *अतिथी डॉ. मंदा नांदुरकर म्हणाले* की राष्ट्रीय सेवा योजना हे व्यक्तीला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ असून राष्ट्रीय सेवा योजनेची महत्व त्यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश पिंपराळे बीएससी भाग 3, आभार प्रा. स्नेहा जोशी *कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी* डॉ.सुमेध वरघट, डॉ. पल्लवी सिंग, प्रा. ऋषभ डहाके
रेणुका भोजने, सौरभ इंगळे, मयुरी गादरे, रितेश दामले,धीरज गाडगे आदी विद्यार्थ्यां, प्राध्यापक वृंद ,कर्मचारी ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले