मराठी
‘आत्मनिर्भर भारत’ पखवाडा अंतर्गत एनसीसी कॅडेट्स राबवत आहे वोकल टू लोकल कार्यक्रम
आठ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमरावतीचा उपक्रम
- सोशल मीडिया द्वारे प्रचार व प्रसार
मोर्शी, तालुका प्रतिनिधी ता.११ संपूर्ण देशभर १ऑगस्ट ते१५ऑगस्ट ‘आत्मनिर्भर भारत’ पखवाडा साजरा केला जात असून यात आठ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमरावतीचे कमाडिंग ऑफिसर कर्नल अलवेन्द्र सिंग बैंस यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स व अधिकारी सहभागी झाले आहेत.
स्वातंत्र्य पूर्व काळात महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता आणि भारतीय जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकत स्वदेशीचा वापर सुरू केला.परंतु आज ७० वर्षानंतर लोक आपल्या सर्वसाधारण गरजा भागविण्यासाठी विदेशी वस्तूचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने स्वदेशी वस्तूच्या वापरासाठी देशातील जनतेचा सक्रीय सहभाग आवश्यक ठरतो त्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत वोकल फॉर लोकलचा नारा दिला असून देशातील जनतेने स्वदेशी वस्तूंचा वापर करीत असतांनाच त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.
प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आठ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमरावती अंतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स व अधिकारी समाजातील विविध घटक,नातेवाईक,मित्र,शिक्षक व विद्यार्थ्यांना चित्रकला, निबंध, वक्तृत्व तसेच व्हिडीओ,व्हॉट्सअप,फेसबुक,ट्वि टर,इन्स्टाग्राम,मेसेज या सोशल मीडिया द्वारे जनजागृती करीत असून त्यांना समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या स्तुत्य उपक्रमात शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी,वरुड येथील न्यू.इंग्लिश हायस्कूल व जागृत शाळा,अमरावती येथील ज्ञानमाता,होलीक्रॉस,जे.एन.व्ही .,प्रभोधन हायस्कुल दर्यापूर,सीताबाई संगई शाळा अंजनगाव,अचलपूर येथील जगदंबा,सिटी हायस्कुल,एम.पी.एल.परतवाडा,दे वराव दादा हायस्कूल तिवसा,गुरुदेव विद्यमंदिर मोझरी,सेफला हायस्कुल धामणगाव रेल्वे,दिपशिका सैनिक स्कुल चिखलदरा या ज्युनिअर डिव्हिजन व विंगच्या शाळेसह सिनिअर डिव्हिजन व विंग मध्ये अमरावती येथील शिवाजी,भारतीय,एच.व्ही.पी.एम., व्हि.एम.व्ही.,केशरबाई लाहोटी,तक्तशीला महाविद्यालय,अशोक महाविद्यालय चांदुर रेल्वे,जे.डी. पी.एस.महाविद्यालय दर्यापूर, आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे,जगदंबा अचलपूर,सारडा महाविद्यालय अंजनगाव,महात्मा फुले महाविद्यालय वरुड इत्यादी शाळा महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स व ऑफिसर्स सहभागी झाले आहेत.