राष्ट्रवादीकडून महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन…
मुंबई/दि. २ – राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुंबई येथील पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज अभिवादन केले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले. त्यांच्यासह राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, माजी आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेस बृहन्मुंबई महानगरपालिका गटनेत्या राखी जाधव, चिटणीस संजय बोरगे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, मुंबई विभागीय विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमोल मातेले, मुंबई विभागीय हिंदी भाषिक सेल अध्यक्ष मनिष दुबे, प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण केली.