मराठी

धामणगावात निलेश विश्वकर्मांची जंगी रॅली

शेकडो तरूणांचा सहभाग, नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद

धामणगाव रेल्वे दि १३ – वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकरल्यानंतर पहिल्यांदाच धामणगाव रेल्वे शहरात आगमन झालेल्या निलेश विश्वकर्मा यांचे जंगी स्वागत करून त्यांची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या शेकडेा तरूण कार्यकर्त्यांनी शहरातील चौकाचौकात फटाक्यांच्या आतषबाजीसह त्यांचे स्वागत केले. विश्वकर्मा यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी जाऊन नागरिकांचे आशिर्वाद घेतले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचे आज सायंकाळी नागपूरमार्गे धामणगाव शहरात आगमन झाले. यावेळी जुना धामणगाव परिसरात शेकडो नागरिकांचा जमाव त्यांच्या स्वागतासाठी तयार होता. फटाक्यांच्या आतषबाजी आणि पुष्पहारांनी त्यांचे जंगी स्वागत नागरिकांनी केले. तसेच प्रत्येक भागात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या फलकाचे उद्धाटन देखील निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते यावेळी पार पडले. जुना धामणगाव परिसरातून धामणगाव मुख्य शहराकडे जाताना प्रत्येक चौकाचौकात माता-भगिनींनी मोठ्या उत्साहाने औक्षण करून निलेश विश्वकर्मा यांचे स्वागत केले तसेच त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह प्रत्येक ठिकाणाहून शेकडो तरूणांचा जमाव बाईकसह जुळत होता. धामणगाव मुख्य शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे स्वागत झाले. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विश्वकर्मा यांनी पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरूवात केली. त्यासोबतच नगर परिषद कार्यालय परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच महात्मा गांधी आणि शहिद भगतसिंह यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांनी आशिर्वाद घेतले.
शहरात ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचे उद्धाटन शनिवारी सायंकाळी निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते पार पडले. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सर्वसमाजाला साथीला घेऊन वंचितांची मोट बांधून महाराष्ट्रात एक जबरदस्त विकासाची लाट आणण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे आश्वासन यावेळी निलेश विश्वकर्मा यांनी गावऱ्यांना दिले. या रॅलीत धामणगाव शहरातील शेकडो तरूण सहभागी झाले होते.

  • व्यापारी-शेतकऱ्यांनीही केले स्वागत

धामगणगाव रेल्वे मुख्य शहरातून निघालेल्या बाईक रॅलीदरम्यान विविध ठिकाणी व्यापारी वर्गाने पुष्पवर्षाव करून तसेच पुष्पहारांनी निलेश विश्वकर्मा यांचे स्वागत केले. यावेळी ठिकठिकाणी शेतकरी तसेच जेष्ठ मंडळींनी देखील विश्वकर्मा यांचे स्वागत केले. यावेळी जेष्ठांचे आशिर्वाद घेत विश्वकर्मा यांनी पुढे मार्गक्रमण केले.

  • अन् माता भगिनी निघाल्या आरतीचे ताट घेऊन

निलेश विश्वकर्मा यांचे आगमन झाल्याचे माहिती होताच घराघरात असलेल्या माता भगिनींनी वेळेवर तयारी करत आरतीचे ताट घेऊन निलेश विश्वकर्मा यांचे औक्षण केले. कुठल्याही तयारीशिवाय माता भगिनींकडून मिळालेल्या या अतुलनिय बंधुप्रेमाचा वर्षाव पाहून निलेश विश्वकर्मा यांचे डोळे देखील पाणावले होते.

Related Articles

Back to top button