मराठी

नितीशकुमार यांना धक्का माजी मंत्र्यानी सोडला पक्ष

राष्ट्रीय जनता दलात प्रवेश

पटणा/दि.१७ – बिहारचे माजी मंत्री व जदयू नेते श्याम राजक यांनी सोमवारी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला. राजक यांनी नितीशकुमारांबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘नितीशकुमार यांच्यावर पक्षातील ९९ टक्के मंत्री नाराज आहेत. ज्या पक्षात सामाजिक न्याय पद्धत उरलीच नाही, त्या पक्षात मी राहूच शकत नाही,‘ असे श्याम राजक यांनी सांगितले. राजक यांनी सोमवारी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत राजदमध्ये प्रवेश केला. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी जदयूतील अनेक नेत्यांच्या मनात खदखद सुरू आहे. जदयूतील ९९ टक्के मंत्री नितीशकुमार यांच्यावर नाराज आहेत; पण काही अद्याप निर्णय घेऊ शकत नाहीत. मला अंदाज नाही की कोण पक्षात राहील व कोण सोडेल. काही दिवसांत जदयूतील परिस्थिती वेगळी असेल. सध्या पक्षात न्याय मिळत नाही. त्यामुळे मी अशा ठिकाणी राहू शकत नाही, असे राजक यांनी सांगितले.

Back to top button