मराठी

कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर तिसरी लाट

जागतिक आरोग्य संघटनेचा युरोपीय देशांसह जगालाच इशारा

न्यूयार्क/दि.२२ – जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगाला, विशेषत: युरोपीन देशांना इशारा दिला आहे, की वेळेत प्रभावी उपाययोजना न केल्यास जगात कोरोना विषाणूची तिसरा लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट जानेवारीपासून येऊ शकते.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी युरोपीय देशांनी पुरेसे उपाय केले नाहीत आणि त्यामुळे युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी सांगितले, की कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची वेळ अजून बाकी आहे, अन्यथा 2021 च्या सुरुवातीला कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पायाभूत सुविधांवर फारसे लक्ष दिले नाही. उन्हाळ्याच्या महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी युरोपीय देश पायाभूत सुविधा तयार करू शकले नाहीत. ती संधी चुकली. त्यामुळे कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेचा उद्रेक झाला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी पायाभूत सुविधा न तयार केल्यास पुढील वर्षाच्या सुरुवातीस तिस-या लाटेचा सामना करावा लागू शकतो.
शनिवारी जर्मनी आणि फ्रान्समध्ये एकत्रितपणे 33 हजार नवे कोरोनाबाधित आढळले. तुर्कस्थानध्ये 5,532 नवीन प्रकरणे नोंदली गेली.

Related Articles

Back to top button