मुंबई/दि.१४ – बँकांच्या अनुत्पादक मालमत्ता प्रमाणा (NPA) बाबत जेवढी भीती दाखविली जात आहे, तेवढी भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. यापुढे एनपीए नियंत्रणात राहील, असे मत स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांनी व्यक्त केले. खारा म्हणाले, की एनपीएबद्दल जादा भीती पसरली आहे; परंतु परिस्थिती तितकी वाईट नाही. एनपीए अनियंत्रित होणार नाहीत. रिझोल्यूशन योजनेमुळे जास्त एनपीए होणार नाही. तथापि, सुस्त अर्थव्यवस्थेचा परिणाम एनपीएवर होऊ शकतो; परंतु अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यानंतर एनपीए कमी होईल. देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँकेने सणासुदीच्या हंगामासाठी विशेष तयारी केली आहे. किरकोळ व कॉर्पोरेट कर्जात वाढ होत आहे. कर्जाची वाढ अपेक्षित आहे. आगामी सणाच्या हंगामात पुनप्र्राप्तीची अपेक्षा आहे. सरकारच्या योजनेमुळे पैसे वापराला चालना मिळेल. किरकोळ कर्जाच्या वाढीमध्ये १४ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ आणि कॉर्पोरेट कर्जातही वाढ होणार आहे.