षड्यंत्राचे तर बळी नाही ना !
सर्वाना हवी-हवीशी आणि हेवा वाटणारी चंदेरी-दुनिया पुन्हा हादरून गेली. दूरचित्रवाहिनी वरील हिंदी मालिका मधून घराघरात पोहोचलेल्या एका अभिनेत्याने आपली जीवन ज्योत आपल्याच हाताने अशी का विझवावी ? आज पासून ठीक ५२ दिवसांपूर्वीच अभिनेता सुशांतसिंह यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. करोना काळातील लाॅकडाऊन मधे घडलेल्या या घटनेनंतर, वेगवेगळे तर्क, नाना चर्चा,दररोज पसरत असलेल्या बातम्या आणि आता,चौकशी व तपासाला घेवून सुरू असलेल्या रस्सीखेचने जनमानस अस्वस्थ झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कुरघोडीचे खेळ बघून,सुशांतसिंहच्या आत्महत्याचं गांभीर्य जावून,व्यवहारी राजकारण्याचा बाज तर चढणार नाही ना? जे काही असेल ते, समोर येणारचं.पण ते खरोखर सत्यचं असेल का ? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.सुशांतसिंहच्या आत्महत्येला अनेक कंगोरे दिसत ( की दाखवले जात आहेत ) असताना,अवघ्या ५२ दिवसात गळफास घेत अभिनेता समीर शर्मा यांनी सुशांतची री का ओढली ? हिंदी मालिकामधूनच सुशांत व समीर यांनी जीवन प्रवास सुरू केला. नाव कमवले. सुशांत चित्रपट क्षेत्रात स्थिरावला. तर समीर शर्मा दूरचित्रवाहिनी मालिकामधे स्थान राखून आहे.अन् दोन महिन्यातच दोघानीही आत्महत्या का केली.हा कळीचा प्रश्न आहे.
समीरच्या आत्महत्येला सुशांतचा तर संदर्भ नसेल ना? कदाचित दोघांचे आत्महत्या मागचे कारण वेगवेगळे किंवा एकही असू शकते. यासाठी कोणी तरी जबाबदार ही राहू शकते किंवा नाही देखील. परंतू एवढा टोकाचा निर्णय घेण्यासारखी परिस्थिती त्यांच्या समोर निर्माण करण्यात आली , की दोघांनीही ती ओढावून घेतली. कोणाच्या षड्यंत्राचे बळी गेले. की स्वत:चा डाव स्वत:वरच उलटल्याने हे पाऊल उचले असावे.असे अनेकानेक जर-तर असू शकतात. जर मानसिक ताणतणावच म्हटलं तर, ते कुणाला नाही. कोण या ताणतणावून सुटलं आहे. हा देह सरणावर गेल्या वरच व्यक्तीचा संघर्ष संपतो.हा संघर्ष कोणालाही सुटला नाही.की कोणाची या मधून सूटका झाली नाही. हे कटूसत्य असून,देशातील आत्महत्त्येचे प्रमाण बघतां सर्वाना कटूसत्य मान्य असल्याचे स्पष्ट होते. पण एवढ्या देखील आत्महत्या का होतात. आयुष्यात सदैव ‘ माॅरल सेंटिमेंट्स’ जोपासणे जरुरी आहे. माॅरल सेंटिमेंट्स जोपासणारी व्यक्ती, टोकाची व्यावहारिकता असलेल्या क्षेत्रात देखील आपला मानवी चेहरा कायम राखून असतो. प्रगतीचे टप्पे सर करताना, माॅरल सेंटिमेंट्सची जोपासणा सोडली की, घात होण्याचा धोका राहतो. जग देखील एक मायानगरीचं असून,पदोपदी असलेल्या स्व- स्वार्थाचा भस्मासूरने अनेकजन खाक होतात. काही होरपळतात, काही बचावतात. कारण जिंद्दगीकी यही रीत है। अशा दुनियेतील मुंबईमायानगरी व चंदेरीजगात तर मानवीसंवेदनाला मुळीच थारा नाही.आणि या अगोदर ही बाब अनेक प्रकरणातून उघड झाले आहे.
चंदेरीदुनिया आणि अंडरवर्ल्ड यांची वीण घट्ट असून अलिकडच्या काही वर्षात मोठे नेता व बड्या उद्योगपतींचा देखील चंदेरी दुनियेत वावर वाढला आहे.हे उघड सत्य असून, अमाप पैसा,अमर्याद सत्ता, मोठी प्रतिष्ठा, स्वछंद जीवन की, मनावर नसलेले बंधन तर ,कारणीभूत नाही ना ? समृद्धीकडे वाटचाल करणारी व्यक्ती सहजरित्या स्वत:ला सहज संपवत असेल तर शेवटी एवढचं म्हणावं वाटते की,
सबकी बात ना माना कर खूदको भी पहचाना कर,
दुनिया में जीना है तो कुछ अमृत पीना है,
तो अपनी ओर निशाणाकर
तेरे साथ रहे हरदम कुछ सन्नाटे, कुछ मेले भी तूने फूल भी,
काँटे भी कुछ पाये, कुछ बांटे भी
अपना आना जाना कर ये जो प्यार मोहब्बत है,
ये तो कागज की छत है,
तू अगर मोहब्बत में था तो दिवाना हो जा
या मुझको दिवाना कर
खुश हो सबसे मिलकर
रहना फुलो सा खिलकर
सचकी राह में चलकर
सचको ही मंझिल कर
गजानन सोमाणी.
9850388255