मराठी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान विलंब न करता तात्काळ मंजूर करावे

उपसमितीची बैठक आयोजित करुण लवकरात लवकर निर्णय घ्या - आमदार श्रीकांत देशपांडे

अमरावती/दि. २३ – कोविड -१९(Covid -19) प्रतिबंधित अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान विलंब न करता तात्काळ मंजूर करण्यासाठी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी आज आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांची यांची भेट घेऊन सर्व बाबीवर चर्चा केली.
राज्यात कोविड-१९ चा प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांना ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत.सदर शिक्षक हे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे करीत आहेत. ड्युटीवर असताना मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याने अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व प्राधान्य क्रमाने कोरोनावर उपचारासाठी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु शिक्षण विभागात या उलट चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा इतर विभागांप्रमाणे अशीच सोय तात्काळ करणे आवश्यक असल्याचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना ड्युटीवर असताना कोरोना बाधित झाले आणि उपचार घेत असताना पुरेशा सोई सुविधा न मिळाल्याने शेवटी मृत्यु पावल्याचे निदर्शनास येत आहे. तरी राष्ट्रीय कर्तव्य करत असताना मृत्यू पावलेल्या उपरोक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या वारसांना विलंब न करता रु ५० लक्ष तात्काळ मिळतील अशी सोय करण्याची मागणी अमरावती विभाग शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे बाळाराम पाटील व आमदार दत्तात्रय सावंत यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केलेली आहे.आपली मागणी रास्त असून सदर बाबत लवकरच योग्य तो निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी ना.राजेश टोपे यांनी उपस्थित शिक्षक आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे ,आमदार बाळाराम पाटील व आमदार दत्तात्रय सावंत यांना दिले असल्याचे स्वीय सहाय्यक रविंद्र सोळंके यांनी सांगितले.
तसेच अनुदानासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमिती सदस्य मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन लवकरात लवकर अनुदान वितरित करण्याची विनंती आमदार श्रीकांत देशपांडे,आमदार बाळाराम पाटील व आमदार दत्तात्रय सावंत यांनी या भेटी दरम्यान केली.*

Related Articles

Back to top button