शेतकर्यांचे उत्पन्नच माहीत नाही, तर दुप्पट कसेकरणार ?
मुंबई/दि. २२ – शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न सरकारनेदाखविलेआहे; परंतु सरकारकडेशेतकर्यांच्या उत्पन्नाची सर्वांत ताजी जी आकडेवारी आहेतीही आठ वर्षेजुनी आहे. 2013 च्या या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न सहा 426 आहे. आठ वर्षांत शेतकर्यांचेउत्पन्न किती हेच ज्या सरकारला ठरविता आले नाही, तेउत्पन्न दुप्पट कसेकरणार, असा प्रश्न उपस्थित होतो.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत सांगितलेकी, सर्वांत ताजी आणि शेवटची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या जुलै2012 ते जून 2013 दरम्यान संशोधनात समोर आली. आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न 77 हजार 112 रुपयेम्हणजे दरमहा सहा हजार 426 रुपये बचत होते, तर शेतकरी कुटुंबाचा सरासरी मासिक खर्च सहा हजार 223 रुपयेआहे. यामुळेमहिन्यात 203 रुपयांची बचत होते. आठ वर्षांपूर्वी 52 टक्केशेतकरी कुटुंबांवर सरासरी 47 हजार रुपयांचे कर्ज होते. नाबार्डच्या 2016-17 च्या सर्व्हेनुसार चार वर्षांत शेतकर्यांचे उत्पन्न दोन हजार 505 रुपयेवाढले. महागाईदराच्या तुलनेत ही वाढही उणेहोईल. तज्ज्ञांनुसार, शेतकर्यांचा इनपुट खर्चवाढत असून जगणेमहाग होत चाललेआहे. यामुळेउत्पन्न दुप्पट करणे निरर्थक ठरेल. कारण, जगण्याचा खर्चजास्त वाढला तर चारपट उत्पन्न होऊनही गुणवत्ता वाढणार नाही.
राजकीय व सामाजिक विश्लेषक एन. के. सिंह यांच्यानुसार सरकारने शेतकर्यांचेउत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेसह सध्याच्या उत्पन्नाचेअचूक मूल्यांकन करायला हवे होते. आठ वर्षेजुन्या अहवालातील आकडेवारीतून योग्य निष्कर्षकाढता येणार नाही. याबाबत स्थापन दलवाईसमितीच्या 2017 च्या अहवालानुसार उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 6.399 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि कृषी निर्यात तीनपट वाढवावी लागेल.