मराठी

आता मालगाड्याही खासगी तत्त्वावर

मुंबई/दि.३ – डेडिकेटेड फ्राईट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल)आणि एनआयटी मालमत्ता कमाईची तयारी करत आहे. त्यातून एक लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयटी आयोग व रेल्वेने यासाठी आराखडा तयार केला आहे. यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक केली जाऊ शकते.
या योजनेंतर्गत ऑप्टिकल फायबरच्या वापराविषयी दूरसंचार कंपन्यांशी चर्चा केली जात आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत रेल्वे आपले 2800 किलोमीटर लांबीचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क खासगी दूरसंचार कंपन्यांना भाड्याने देऊ शकेल. टेलिकॉम कंपन्यांनाही याचा फायदा होणार आहे. या योजनेनुसार, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) ट्रॅकवर ऑप्टिक फायबर लीजवर देता येईल. याशिवाय खासगी कंपन्यांना डीएफसीवर मालवाहतूक गाड्या चालवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. डीएफसी ट्रॅकमध्ये दररोज 240 फ्रेट गाड्या चालवण्याची क्षमता आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न कॉरिडोर जून 2022 पर्यंत चालू होतील. ही योजना कार्यरत राहिल्यास, खासगी कंपन्या समर्पित फ्रेट कॉरिडॉरवर त्यांच्या गाड्या चालविण्यास सक्षम असतील. यासाठी त्यांना रेल्वे वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 800 ते हजार रुपये दराने भाडे द्यावे लागणार आहे.
या बातमीनंतर स्टरलाइट टेक आणि कंटेनर कॉर्पोरेशन सारख्या समभागांनी उसळी घेतली.

Related Articles

Back to top button