मराठी

आता रोबेटिक किचनही बाजारात

लंडन/दि. १६ –  रोबोटिक मशीननंतर रोबोटिक किचनही तयार आहे. रोबोटिक किचन डिझाइन करणारी ब्रिटनमधील कंपनी मोल रोबोटिक्स म्हणते, की रोबेटिक्सचे दोन हात मास्टर शेफ विजेता टीम अँडरसनसारखे काम करू शकतात. स्वयंचलित किचन आपोआप रेफ्रिजरेटरमधून वस्तू काढून घेते. भांड्यात वस्तू ठेवते. स्वयंपाक करण्यासाठी किती तपमान ठेवावे, हेदेखील निर्धारित करते. एवढेच नव्हे तर ते आपल्याला भोजन वाढू शकते.
मानवांप्रमाणेच हाताचा वापर करून अन्न कसे शिजवावे हे रोबोट्सला सांगायची गरज नाही. स्वयंचलित स्वयंपाकघर सहा वर्षांत तयार झाले आहे स्वयंचलित स्वयंपाकघर शेकडो डिझाइनर आणि अभियंत्यांनी डिझाइन केले आहे. ज्या पथकाने त्याचे उत्पादन केले, त्या संघात तीन पुरस्कारप्राप्त शेफदेखील समाविष्ट आहेत. मोल रोबोटिक्स या कंपनीचे म्हणणे आहे, की ही एक लक्झरी किचन आहे, ज्याची किंमत 29 ते 54 लाख रुपयांपर्यंत आहे. किंमत स्वयंपाकघरच्या कॉन्फिगरेशनवर अवलंबून असते. कॅमेरे आणि सेन्सर मदत करतात. यात रोबोटिक कॅमेरे आणि सेन्सर आहेत. ज्याच्या मदतीने रोबोट वस्तू शोधतो, भांडी उचलतो आणि अन्न तयार करतो. भांडी स्वच्छ केली, की नाही हे कॅमे-याच्या मदतीने पाहता येते. एवढेच नव्हे तर स्वयंपाक करतानाही संक्रमण पसरत नाही, यासाठी रोबोटमध्ये एक अतिनील दिवा आहे, जो किचनच्या पृष्ठभागावरील जंतूंचा नाश करतो.
स्वयंचलित स्वयंपाकघरात स्मार्ट फ्रीज आणि स्टोरेज क्षेत्र निश्चित केले गेले आहे. जेव्हा वस्तू संपण्याची तारीख जवळ येते, तेव्हा त्याची माहिती दिली जाते. ओव्हन, इंडक्शन आणि सिंक वापरतानादेखील ते अ‍ॅलर्ट पाठवत राहतात. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क अ‍ॅलनिक यांनी सांगितले, की हे जगातील पहिले ग्राहक रोबोटिक किचन आहे. ते विक्रीसाठी आहे. या किचनची मागणी वाढल्यास किंमती कमी होतील. या मदतीने कमी-कॅलरी ते विशेष आहारयुक्त पदार्थ तयार केले जाऊ शकतात.

Related Articles

Back to top button