मराठी

मोठ्या व्यक्तींनी थांबविला व्हाॅटस्‌एपचा वापर

मुंबई/दि. १२ –  गोपनीयता धोरणात बदल झाल्यानंतर मोठ्या लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर थांबविला आहे. भारतातही ब-याच कंपन्या आणि बड्या कॉर्पोरेट व्यक्तिमत्त्वांनी व्हाट्सएप सोडून सिग्नल अॅप सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये स्टार्टअप कंपन्या आणि जुन्या कॉर्पोरेट्स आणि त्यांचे वरिष्ठ नेते यांचा समावेश आहे. हे लोक आता त्यांच्या कामाच्या गप्पा आणि अंतर्गत दस्तऐवज सामायिक करण्यासाठी सिग्नल वापरत आहेत.
महिंद्र आणि टाटा समूहाचे अध्यक्षही सिग्नल वापरायला लागले आहेत. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नुकताच सिग्नलचा वापर सुरू केला. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे सिग्नल वापरायला लागले आहेत. याशिवाय टाटा समूहाचे अनेक वरिष्ठ अधिकारीही आता त्याचा वापर करत आहेत. पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी आपल्या कर्मचा-यांना कामाच्या संप्रेषणासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू नये, असे सांगितले आहे. फोनपेचे सहसंस्थापक समीर निगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या टीममधील निम्म्या लोकांनी सिग्नल वापरण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये व्हॉट्सअॅपविरोधात निषेध जिंदल स्टील पॉवरचे मुख्य मानव संसाधन अधिकारी पंकज लोचन म्हणाले, की कंपनी दिवसेंदिवस अधिकृत संप्रेषणासाठी व्हाॅट्सॲपपासून दूर जायला लागली आहे. उद्योजक आणि पत संस्थापक कुणाल शाह यांनी सिग्नल अ‍ॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये व्हॉट्सअॅपलाही विरोध केला जात आहे. गुंतवणूकदार आणि फेसबुकचे माजी कर्मचारी चामथ पालीहपाटिया यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले, की व्हॉट्स अॅपने’ प्रायव्हसी ‘या सर्वोत्कृष्ट फीचरची हत्या केली आहे. कृपया मला आता व्हॉट्सअ‍ॅपवर मजकूर पाठवू नका. @ सिग्नलएप डाउनलोड करा.
व्हॉट्सअ‍ॅपचा वापर कमी झाल्याने व्हॉट्सअ‍ॅप डाऊनलोड्सचे प्रणाण जगभरात घसरले आहे. आकडेवारीनुसार एक ते नऊ जानेवारी दरम्यान व्हॉट्सअॅप तीस लाख वेळा डाऊनलोड झाले. सप्टेंबर 2020 नंतरची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ३४ लाख वेळा डाउनलोड केले गेले. दुसरीकडे, सिग्नल एक ते नऊ जानेवारी दरम्यान 18 लाख वेळा डाउनलोड केले गेले, तर 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ते केवळ 14 हजार लोकांनी डाउनलोड केले होते. व्हॉट्सअॅपने नुकतीच पेमेंट्स क्षेत्रात प्रवेश केला होता. आता या वादाचा फायदा घेत दोन्ही कंपन्यांनी आपापल्या संघांना व्हॉट्सअ‍ॅप सोडण्यास सांगितले आहे. याशिवाय नवीन जिंदाल यांच्या नेतृत्वात कंपनी जिंदाल स्टील अँड पॉवरने व्हॉट्सअ‍ॅप वापरणेही बंद केले आहे. एलोन मस्कने सिग्नल अ‍ॅप वापरण्यास सांगितले. आठ जानेवारी रोजी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी लोकांना व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक सोडून सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप अवलंबण्याचे आवाहन केले. यानंतर सिग्नलची लोकप्रियता अचानक वाढली आहे.

Related Articles

Back to top button