मराठी

भारतीय जनता पार्टी शाखा पुसलाच्या वतीने

वरुड पांढुर्णा रस्त्यावर आंदोलन

वरुड दी ३ – वरुड-पांढुर्णा रस्त्यावरील पुसला गावा लगतच्या वनविभागाच्या डेपो जवळ मोठ्या प्रमाणात खड्डे असून एचजी इन्फ्रा कंपनीने सिमेंटचा रस्ता तयार केला होता परंतु काही भाग हा वनविभागात येत असल्यामुळे आणि वनविभागाच्या आडकाठीमुळे व काही विघ्न संतोषी लोकांमुळे हा रस्ता डांबराचा तयार केला गेला. आता या रस्त्यावर खुप प्रमाणात खड्डे पडले आहे, ते खड्डे बुजविण्यात यावे, या मागणीसाठी शहरातील पांढूर्णा चौक परिसरात भाजपा शाखा पुसलाचे वतीने रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, या खड्डयांमुळे भरपूर अपघात झाले आहे व काही लोक गंभीर जखमी झाले. भविष्यात हे खड्डे जीव घेणे होऊ शकते. यामुळे आज भारतीय जनता पार्टी पुसला तर्फे आंदोलन करण्यात आले. जर या रस्त्यावरील खड्डे चार दिवसात बुजवले नाही तर भारतीय जनता पार्टी शाखा पुसलाचे वतीने वरुड शहरातील पांढूर्णा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुसला भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात आला होता.
या आंदोलनादरम्यान विलास पवार, अमित खेरडे, इंद्रभूषण सोंडे, स्वप्निल मांडळे, अजाब बोदड, विजय बरगट, जानराव उईके, गुड्डु ठाकुर, रोशन कांडलकर, योगेश श्रीराव, उमेश गेटमे, रामेश्वर कुहिटे, सुनिल खंडेलवाल, राजु नेरकर, जाधव, कोहळे, सुरज गुलांदे, प्रितम लोखंडे, बाळु बमनोटे, दिलीप गेटमे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button