मराठी

टायगर गृपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वरुड येथे ब्लँकेट वाटप व रक्तदान शिबिर

वरुड प्रतिनिधी. ४ नोव्हेंबर – टायगर गृपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ब्लॅंकेट वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आता दिवसेंदिवस थंडी वाढत आहे याचे गांभिर्य लक्षात घेऊन गरजू व गोरगरीब लोकांना थंडी पासून संरक्षण मिळावे या उद्देशाने मानव अधिकार व भ्रष्टाचार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा टायगर गृपचे किशोर गुल्हाने यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन ब्लॅंकेट वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गरजू लोकांना ब्ल्ॉकेट वाटप करणे व ५ नोव्हेंबर २०२० रोज बुधवारला स्थळ बजरंग ट्रेडिंग कंपनी, सातपुडा जिनिंग वरुड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे दिसून येते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मानव अधिकार व भ्रष्टाचार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर गुल्हाने, राष्ट्रीय महासचिव धनंजय गायकी, संजय चौधरी, भुषण फरकाडे, आकाश गोडेकर, मयुर कोठे, पंकज गोहाड, महेश सनेसर, विजय निस्वादे, तन्मय पाडोळे, प्रज्वल मानेकर, संजय महल्ले, सुशिल साजपूत, मयुर गावंडे, आदेश महल्ले, तेजस पाटील, अमितेश काळे, निखिल घोरमाडे, आकाश बाखाल, लवकेश घोरपडे, तेजस फरकाडे, गौरव सुरजुसे, इरफान पठाण, ऋषिकेश काळे, सागर बरडे, भावेश गावंडे, पंकज वाघ व समस्त टायगर गृप वरुड तालुका यांचे विशेष योगदान असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button