गोंदिया/दि.९ – भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडात 11 निष्पापांचा बळी गेल्यावर आरोग्य संचालनालयाने दोन वर्षेप्रतीक्षेत असलेले एक कोटी 53 लाख रुपये भंडारा जिल्हा रुग्णालयास पाठवलेआहेत. भंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दररोज सरासरी 30 ते40 बालके उपचारासाठी दाखल होतात. दुर्घटना घडली, त्या दिवशी सुदैवाने केवळ 17 बालके होती; मात्र त्या दुर्घटनेनंतर लोकांच्या मनात भीती व अविश्वास निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरात फक्त सात बालकेउपचारासाठी आली. आगीत इन बोर्न आणि आऊट बोर्न या दोन्ही कक्षातील उपकरणेजळाल्यावर जिल्हा रुग्णालयात तात्पुरता कक्ष तयार करण्यात आला आहे. यासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयातून ‘इन्क्युबेटर लोन’ म्हणून घेण्यात आलेआहेत. ताब्यात घेताना चालू स्थितीत दिसणारी ही इन्क्युबेटर्स प्रत्यक्ष कामात ड्रीप होऊ लागल्याने ती बाजूला ठेवण्यात आली आहेत. येथे कार्यरत बालरोगतज्ञ परिसेविका 2012 मध्ये निवृत्त झाल्यापासून हा चार्जजनरल परिसेविकेस देण्यात आला होता. दुर्घटनेच्या वेळी ड्यूटीवर नसताना तसेच माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन सात बालकांना सुरक्षित बाहेर काढल्यावरही निलंबनाच्या कारवाईस सामोरेजावे लागल्याने या कक्षाचा चार्ज स्वीकारण्यासाठी अन्य परिसेविका आता तयार होत नाहीत. या दुर्घटनेनंतर भंडारा दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी बेहरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते. सरकारने जाहीर केल्याप्रमाणेया दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख आणि शिवसेनेकडून एक लाख अशी सहा लाखांची मदत तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलेली मदत या महिनाभरात पीडित कुटुंबांना मिळाली आहे; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनची मदत अद्याप पोहोचलेली नाही. भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निप्रतिबंध उपाययाजनेसाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडे पाठवलेला एक कोटी 53 लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागानेमंजुरी दिली असून ही रक्कम भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या खात्यावर वर्गही झाली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांच्या तपासासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले सील काढल्यावर या रकमेतून बालकांच्या अतिदक्षता विभागाची पुढील दुरुस्ती व उपाययोजनांचे काम सुरू होणार आहे.