जालना/ दि.१३ – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आलेल्या १२ लाख ५० हजार किटस् या सदोष असल्याची कबुली राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, खरेदी करण्यात आलेल्या १२ लाख ५० हजार पेक्षा सदोष असणाèया आरटीपीसीआर किटस्खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. कोरोना तपासणीच्या किटस् खरेदीतील गैरव्यवहाराबाबत भाष्य करण्याचे टोपे यांनी टाळले. ‘या सगळ्या सदोष कोरोना चाचणी किटस्वैद्यकीय शिक्षण संचलनलयाने खरेदी केलेल्या आहेत. यापुढे आम्ही प्रत्येक किटस्ची बॅच तपासणी करून मगच पुढे पाठवू, असे म्हणत टोपे यांनी आरोग्य खात्याची पाठराखण केली आहे. कोरोना काळात अँटीजन आणि आरटीपीसीआर अशा दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी अँटीजन आणि आरटीपीसीआर अशा दोन प्रकारच्या चाचण्या प्रामुख्याने केल्या जातात. त्यातील अँटीजन चाचणी केल्यानंतर सहा ते १५ टक्क्यांपर्यंत खात्रीशीर निदान होते.
त्याचबरोबर आरटीपीसीआर या चाचणीमध्ये ३० टक्के खात्रीशीर निदान केले जाते, अशी मान्यता आहे. यामुळे १२ लाख ५० हजार किटस्खरेदीदेखील करण्यात आल्या होत्या; मात्र या किटस् सदोष निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील विविध आरटीपीसीआर लॅबोरेटरीमध्ये गेल्या पाच ऑक्टोबरपासून कोरोनाव्हायरस संसर्गाच्या पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे असे बोलले जात आहे. आयएमसीआर तपासणीमध्ये हे सिद्ध झाले आहे, की सदर कंपनीने पुरवठा केलेल्या किटस् सदोष आहेत, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते. हे प्रकरण अतिशय गंभीर बाब आहे, जे कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, त्यांना नकारात्मक अहवाल आल्यामुळे वैद्यकीय उपचार मिळणार नाहीत आणि विशेष म्हणजे ते बाहेर फिरून संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.