वरुड/दि.२७ – येथून जवळच असलेल्या जरुड येथे जुन्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना काल (ता.२६) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत एक युवक गंभिर जखमी झाला असून या प्रकरणी वरुड पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहीतीनुसार, जरुड येथे गोठाण चौक येथे युवक गप्पा मारीत बसले असतांना रमाकांत ब्राम्हणे व निलेश सुरजूसे यांच्या क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. वाद सुरुच असतांना निलेश सुरजूसे याने धारदार शस्त्र आणले थेट रमाकांत ब्राम्हणे यांचे पोटामध्ये खुपसले. गंभिरावस्थेत रमाकांत याला ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या दीड वर्षांपुर्वी निलेश याचे वडिल वामन सुरजूसे यांना रमाकांत याने चाकुने जखमी केले होते, तो वाद अद्यापही न्यायालयात सुरु असतांना या घटनेने पुन्हा दोन्ही परिवारामध्ये वाद निर्माण झाला आहे.
याप्रकरणी रमाकांत मधुकर ब्राम्हणे (३५) रा.जरुड यांचे तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी निलेश वामन सुरजूसे (२५), सोनू वामन सुरजूसे (३५) आणि वामन सुरजूसे (५५) यांचे विरुध्द वरुड पोलिसांनी भादंवि ३२६ अन्वयेक गुन्हा दाखल करुन तिघांनाही अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक राजु चव्हाण, हे.काँ.अशोक संभे, मनोज कळसकर करीत आहेत.