नवीदिल्ली/दि. २३ – गेल्या काही वर्षांपासून भारतीय चीनमधून मोठमोठे कंटेनर भरून साहित्य आयात करत होते. एवढे की घरातील सारया वस्तूच चिनी बनावटीच्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मुलांची खेळणी आदी सारे काही चिनी होते. आज कोरोनाने हे पारडेच पालटले आहे. गलवान खो-यातील घटनेनंतर संपूर्ण देशात चिनी मालावर बहिष्काराची मोहीम सुरू झाली आणि चीनच्या उत्पादनांची मागणी घटली. त्याचवेळी चीनमध्ये मात्र भारतीय मालाची मागणी वाढली.
रेल्वे, बीएसएनएल,(BSNL) राष्ट्रीय महामार्गातून चीनसोबतचे कोट्यवधींचे करार मोडून काढले. याचबरोबर सरकारने ३७१ चिनी(China) उत्पादनांवर हळूहळू बंदी आणण्यास सुरुवात केली आहे. यावर कामही केले जात आहे. एकीकडे ही स्थिती असताना भारतीय उत्पादनांची आता चीन आयात करू लागला आहे.
भारताने आयात घटविली असली, तरीही निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार जूनमध्ये चीनला निर्यात केल्या जाणाèया उत्पादनांमध्ये थोडी थोडकी, नव्हे तर ७८ टक्क्यांची वाढ झाली आहे. चीनने कोरोनावर ताबा मिळविला असल्याने तिथे भारतीय वस्तूंची मागणी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. जुलै महिन्यामध्येही भारतीय वस्तूंना मोठी मागणी राहिली आहे. चीनमध्ये निर्यातीत ७८ टक्के, मलेशियामध्ये ७६ टक्के, व्हिएतनाम, सिंगापूरमध्ये(Singapur) ३७ टकक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिका(America), इग्लंड(England), ब्राझीलसह(Brazil) युरोपीयन(Europe) देश आताही कोरोना संकटाशी सामना करत आहेत. त्यामुळे तिथे केली जाणारी निर्यात घटली आहे. संयुक्त अरब अमिरातीसाठी निर्यात ५३.२ टक्के, ब्रिटन ३८.८ टक्के, अमेरिका ११.२ टक्के आणि ब्राझीलसाठी ६.३ टक्के निर्यात घटली आहे.