मराठी

जादा वीजबिल आल्याने नागपुरात एकाची आत्महत्या

नागपुर :– जादा वीजबिल आल्याने नागपूरमध्ये एका ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. लीलाधर गायधणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गायधणे यांना ४० हजार रुपयांचे वीजबिल आले होते. अचानक एवढ्या मोठ्या रक्कमेचे वीज बिल आल्यामुळे गायधणे अस्वस्थ झाले होते. त्यांनी बिल कमी करावे, या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली होती; पण अनेकदा प्रयत्न करूनही वीजबिल कमी झाले नाही.

Back to top button