मराठी
एक कोटी आदिवाशी जमातीचे नेतृत्व मा. मंत्री डॉ. डी एम भांडे यांचे पदाधिकाऱ्यांन मार्फत राज्यभर निवेदन
भातकुली दि ११ :- आदिवासी जमातीचे नेते मा. मंत्री डॉ. डी एम भांडे साहेब यांचे नेतृत्वात आज व त्यांचे पदाधिकारी मार्फत सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालया मार्फत मा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बाबत 1950 पूर्वीची अट शिथील करून जे हजारो आदिवासी कर्मचारी नोकरीवर असून सर्वोच्च न्यायालयाच्या चुकीचा अर्थ लावून महाराष्ट्र शासन पूर्व लक्ष्मी प्रभावाने अंमल बजावणी करीत आहे ती त्वरित या नावे अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर केले असून त्यामध्ये मनोहरराव बुध,भास्करराव कोलटेके,श्री कर्नल गाडे ,बद्रीनाथ जी भोपसे , समाधान राव दहातोंडे , लताताई रायबोले, शालिनीताई भोपसे ,शंकरराव डोंगरे, विक्रांत खेडकर, दिनेश खेडकर, संजय चूनकीकर, गजानन चूनकिकर, पुरुषोत्तम खोबरखेडे, पुरुषोत्तम खरचान,गजानन कोलटेके ,गजानन धनवाडे, वसंतराव इंगळे, एकनाथराव जुवार ,गजानन कासमपुरे, वंदनाताई जामनेकर ,इत्यादी बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित असून आम्ही सर्व आदिवासी बांधव यापुढेही माननीय माजी मंत्री डॉ. डी एम भांडे साहेब यांच्या नेतृत्वात यांच्यासोबत भारतभर व महाराष्ट्रभर राज्यभर मोठे आंदोलन करू असे ठणकावून सांगितले.