महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व ठिय्या आंदोलन
वरुड ४ सप्टेंबर – स्वामिनाथन आयोग लागु करा, लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळातील शेतकरी विरोधी सर्व अध्यादेश मागे घ्या, संपूर्ण कर्जमाफी द्या, पेट्रोल डिझेलचे दरवाढ मागे घ्या, आयकर न भरणाऱ्या सर्व कुटुंबाला दरमहा ७ हजार ५०० कोविड नुकसान भरपाई देण्यात यावी, प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती १० किलो गहू देण्यात यावे, मनरेगाची कामे वर्षातून दोनशे दिवस उपलब्ध करून द्यावी, अन्नसुरक्षा कायद्यातही सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत हमी निर्माण करा किसान मजूर ग्रामीण कारागिरांकरीता पेन्शनचा केंद्रीय कायदा करा, डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून पिकाच्या भावाची हमी द्या, शासकीय खरेदी करा, आरोग्य कायद्याची केरळच्या पद्धतीने अंमलबजावणी करा, १४ वर्षाखालील मुला मुलींना संपूर्ण मोफत शिक्षण द्या, लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करा या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे मार्गदर्शक अरविंद वानखडे, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव बेले, सचिव कैलास बेलसरे, शिवराज शिंदे, गोपाळराव अंबाळकर, मारोतराव दुर्वे, प्रकाश बोबडे, सुकलाल कैथवास, मधुकर कहाते, अजित वानखेडे, ज्ञानेश्वर मालपे, अमृतराव महल्ले, विठ्ठल नामदेव दवंडे, सुनिल बावनकर, नामदेवराव दवंडे, डी.एस.बनसोड, जी.एस.खासबागे, शेखर भोंडे, रविंद्र काळे, नरेंद्र चिमोटे, किशोर निकम, आर.बी.कुमरे, तुषार ठाकरे, एन.जी.लबडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.