मराठी

दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

कुरळी बसस्थानकानजीकची घटना

वरुड/दि.८ – दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोघे गंभिर जखमी झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या कुरळी बसस्थानकावर घडली.
याबाबत प्राप्त माहीतीनुसार, शहरातील पोस्ट ऑफीस परिसरातील रहिवाशी असलेले दिनेश होले हे स्वत:च्या दुचाकीने शेतात गेले होते. शेतातून परत येत असतांना समोरुन भरधाव व अनियंत्रीत दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दिनेश होले यांचेसह दुस:या दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. अपघात घडल्याचे कळताच कुरळी येथील नागरिकांनी जखमींना तातडीने वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. दिनेश होले यांची प्रकृती गंभिर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचाराकरीता अमरावती येथे पाठविण्याचा सल्ला दिला. अमरावती येथे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दिनेश विठ्ठलराव होले (६५) हे वरुड संत्रा बागाईतदार सोसायटीचे माजी कर्मचारी होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शहरात शोककळा परसली. अत्यंत मृदभाषी आणि कष्टाळू असलेले दिनेश होले यांच्या निधनाने अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
याप्रकरणी वृत्त लिहीस्तोवर पोलिस तक्रार झाली नव्हती.

Back to top button