मराठी
न्हावाशेवा बंदरावर एक हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त
मुंबई :- नवी मुंबईतील नाव्हाशेव्हा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल एक हजार कोटी रुपये qकमतीचे अंमली पदार्झ जप्त केले. प्लॅस्टिकच्या पाइपमधून हेरोइन्स ड्रग्सची तस्करी केली जात होती. हे ड्रग्स अफगाणिस्तान आणि इराणहुन मुंबईत समुद्राच्या मार्गाने आणण्यात आले होते. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. प्लॅस्टिकला अशा प्रकार रंग मारण्यात आला होता, की जणू त्या बांबूच्या काठ्या आहे. एवढेच नाहीतर ड्रग्स माफियांनी हे साहित्य आयुर्वेदिक औषधी असल्याचा बनाव केला होता.