मराठी

नाशिक जिल्ह्यात दुस-या दिवशीही कांद्याचे लिलाव बंद

केंद्राच्या अटीविरुद्ध लढा

नाशिक/दि.२७  – नाशिक जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी कांदा लिलाव बंद आहेत. जिल्ह्यामधील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. केंद्र सरकारने घाऊक व्यापा-यांना २५ टन व किरकोळ व्यापा-यांना दोन टनाची मर्यादा ठरवून दिली. त्यामुळे व्यापा-यांनी लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोमवारी कांदा लिलाव न झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. आजही लिलाव बंद आहेत. लिलावात सहभागी व्हावे, यासाठी बाजार समितीने व्यापा-यांना पत्र पाठवले आहे; मात्र बाजार समिती प्रशासनाला व्यापा-यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. केंद्र सरकारने कांदा साठवणुककीवर मर्यादा घातल्याने लिलाव बंद आहेत. कांदा साठवणूक मर्यादा रद्द करण्याची मागणी व्यापा-यांनी केली आहे. कांद्याचे लिलाव बंद असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. किरकोळ बाजारांमध्येही आता कांद्याचे दर शंभर रुपयापर्यंत पोहोचले आहे. हे दर नियंत्रणात आणता यावेत, यासाठी केंद्र सरकारने कांदा साठेबाजीवर निर्बंध घातले. निर्यात बंदी, प्राप्तिकर धाडी आणि आता साठवणुकीवर मर्यादा यामुळे व्यापारी वर्गाने कांदा लिलावावर बेमुदत संप सुरू केला आहे; मात्र याचा थेट परिणाम शेतक-यांवर होणार आहे. कांद्याला सध्या चांगला भाव मिळत आहे; मात्र या सर्व घटनांमुळे कांद्याचे भाव घसरणार आहेत. शेतकèयाला त्याचा फटका बसणार आहे.

Related Articles

Back to top button