मराठी

आझाद मैदानावर फटाका व स्वेटरची दुकाने लावण्याकरीता ऑनलाईन अर्ज

यवतमाळ, दि. १९ : आझाद मैदान मध्ये फटाका व स्वेटरची दुकाने लावण्याकरीता दिनांक 19 ऑक्टोबर 2020 पासून भाडेतत्वावर जागा मिळविण्याकरीता https://sdoyavatmal.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करणेबाबत वेबसाईट खुली करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आणि उच्च न्यायालय नागपुर खंडपीठाच्या निर्देशाप्रमाणे सदर आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने कोव्हिड – 19 या विषाणूजन्य आजाराचा प्रसार रोखण्याच्यादृष्टीने देण्यात आलेल्या अटी व शर्तीला अधीन राहून परवानगी देण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button