वरुड दी ३– गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवाच्या तयारीवर मुर्तिकार नाराज असुन यंदा मंडळाकडुन मुर्तीचे ऑर्डर फारच कमी असल्याने नवरात्रोत्सवात २५ टक्के व्यवसायाची अपेक्षा असल्याची माहिती मुर्तिकारांनी दिली आहे.
यावर्षी गणेशोत्सवात मुर्तीची उंची कमी करण्याच्या प्रशासनाच्या आदेशामुळे मुर्तिकारांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. एका आकडेवारीनुसार ४ लाखांच्या तुलनेत यंदा जवळपास १.५० लाख मुर्तीची विक्री झाल्याची माहिती आहे. तशीच स्थिती नवरात्रोत्सवात दिसुन येत आहे. या उत्सवात घरगुतीऐवजी मंडळाच्या उंच मुर्तीची जास्त विक्री होते. पण चार फुटांपेक्षा जास्त उंच मुर्तीना परवानगी नसल्याने मंडळाच्या पदाधिका:यांनाही यंदा साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळाचे दोन ते चार फुट उंचीच्या मुर्तीचे ऑर्डर आले आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याचे मुर्तिकारांनी सांगितले. नवरात्रोत्सवाच्या तयारीवर मुर्तिकार नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता नवरात्रोत्सावासाठी १५ दिवस उरले आहेत. यावर्षी गरबा आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन साध्या पद्धतीने करायचे आहे. यंदा उत्साह नाही. दुर्गादेवीची मुर्ती ७ ते १० फुट उंच असते. या संदर्भात मनपातर्फे निर्देश न आल्याने मुर्तिकारांनी गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवात दुर्गादेवीची चार फुट उंच मुर्ती तयार करणे सुरु केले आहे. गेल्या सात महिन्यांपासुन अत्यंत साध्या पद्धतीने प्रत्येक जण आणि उत्सव साजरा करण्यात येत असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील मुर्तिकार आर्थिक संकटात आहेत.