मराठी

अर्थव्यवस्थेचा विचार करून तरी मंदिरे उघडा

विखे नगर/दि.१० – ‘ठाकरे सरकार मंदिरे खुली करण्यासंबंधी एवढा हट्टीपणा का करते, हेच कळत नसून, या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी, असा टोला आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. ‘मंदिरे उघडण्यासाठी झालेल्या आंदोलनांतील भाविकांच्या भावानांचा नसेल, तर किमान मंदिरांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचा विचार करून तरी राज्य सकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला पाहिजे‘ असे ते म्हणाले. प्रवरानगर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधू-संत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे १३ ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्याला पाqठबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासंबंधी विखे पाटील यांनी भूमिका मांडली. ‘अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने अन्य व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे; मात्र मंदिरे उघडण्यासाठी अनेकदा मागण्या आणि आंदोलने होऊनही याची दखल घेतली जात नाही. या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी. मोठी मंदिरे असलेल्या गावातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचे गांभीर्य सरकारने लक्षात घेण्याची गरज आहे,‘ असेही विखे पाटील म्हणाले.

Related Articles

Back to top button