‘दार उघड उध्दवा दार उघड’ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
वरुड शहरासह तालुक्यात जागोजागी घंटानाद आंदोलन
वरुड/दि.२९ – लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात सर्रासपणे दारु दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचे टाळे तसेच ठेवले गेले. सरकारची ही कृती धर्मविरोधातील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनाकडे देवालयात भाविकांना परवानगी द्या, अशी मागणी केली जात आहे. केंद्र शासनाची मंदिरे उघडण्यासाठी परवानगी असतांना सुद्धा ठाकरे सरकारने अद्यापर्यंत मंदिराचे दार उघडण्यास परवानगी दिलेली नाही. शासन हिंदू सणांवर निर्बंध कसे घातले जातील, या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी केला असून या सरकारला हिंदू भाविकांच्या भावना लक्षात याव्यात आणि सरकारला जागे करण्यासाठी आज वरुड शहरासह तालुक्यात जागोजागी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत, या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने वरुड तालुक्यासह शहरात घंटा नाद आंदोलन करण्यात आले. वरुड शहरातील केदारेश्वर मंदिराचे दर उघडले तर उदापूर येथील श्रीकृष्ण मंदिर, पुसलामध्ये भाजप कार्यकत्र्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केलं. यावेळी ‘दार उघड, उद्धवा दार उघडÓची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
टाळ, मृदंग आणि घंटा वाजवत आंदोलन केलं. यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते मंदिरासमोर जमा झाले. यावेळी भाजप कार्यकत्र्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘दार उघड, दार उघड, उद्धवा दार उघडÓ अशा घोषणा देत मंदिर उघडण्याची मागणी आंदोलनकत्र्यांनी केली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर वानखडे, गोपाल मालपे, शहराध्यक्ष डॉ.निलेश बेलसरे, भाजपा तालुकाध्यक्ष हितेश तडस, भाजयुमो शहराध्यक्ष नितीन गुर्जर, भाजपा महिला आघाडी ज्योती कुकडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रविराज पुरी, सचिव सुधिर बेलसरे, नगरसेवक राजू सुपले, उपाध्यक्ष विशाल आजनकर, रोषन धोंडे, यशपाल राऊत, सचिव दिपक कोचर, सदस्य बबलू भोरवंशी, सोशल मिडिया प्रमुख अपूर्व आंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.