वरुड/दि.८ – विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा बागांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून आंबिया बहाराची संत्रा फळांची अवेळी मोठया प्रमाणात फळगळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परिणामी मेहनतीने पिकविलेला संत्रा मातीमोल होत असल्याने संत्रा उत्पादक शेतक:यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया ही बिरुदावली मिळवून जिल्हाच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका निभावणा:या वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, परतवाडा, अचलपूर या तसेच इतर तालुक्यातील मुख्य पिक म्हणून संत्रा शेती ओळखली जाते. संत्रा बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुड मोर्शी या परिसरात संत्र्याचे भरघोस उत्पादन होऊन आंबट गोड चवीची संत्रा फळे देशभरात निर्यात केली जातात. आंबिया व मृग बहाराची संत्री शेतकरी घेतात. सध्या आंबिया बहाराची संत्रा फळे शेतक:यांच्या संत्रा बागेत असून त्यावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडावरील हिरवी संत्रा फळांची मोठया प्रमाणात फळगळती होत असून संत्राच्या झाडाखाली पडलेल्या संत्रा फळांचा खच दिसून येत असल्यानेे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जीवापाड मेहनत व संत्रा फुटीसाठी हजारोंचा खर्च शेतक:यांनी केला मात्र आता फळझाडांखाली पडलेली संत्रा फळे वेचून फेकुन देण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे. विशेष म्हणजे काही तालुक्यात यावर्षी मृग बहार फारच कमी प्रमाणात फुलला. त्यासाठी केलेला खर्चही निघाला नाही त्यामुळे आंबिया बहराच्या संत्रावर शेतक:यांचे अर्थकारण अवलंबून होते कोरोना मुळे देशभरात संत्र्यांला मोठी मागणी पाहता यावर्षी चांगले बाजारभाव मिळेल या अपेक्षेत शेतकरी असतांनाच आता आंबिया बहाराच्या संत्रा फळांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संत्राफळांची फळगळती होत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतक:यांनी शेतकरी चिंताग्रस्त झाला असून कृषी विभागाने याची दाखल घेऊन उपाययोजना सुचवाव्या, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करीत आहे.