मराठी

संत्रा उत्पादकांनी क्षेत्राचे भौगोलिक नामांकन प्राप्त करावे

विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांचे आवाहन

वरुड/दि.३० – विदर्भ अॅग्रीकल्चर अॅन्ड अलाईड प्रोड्युसर्स कंपनी लिमीटेड (वॅपको) या संस्थेशी सलंग्न असलेल्या श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीमार्फत ११ संत्रा उत्पादकांचा भौगोलिक नामांकनाचा प्रस्ताव, विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांचे हस्ते कायदेशीर सल्लागार अॅड.झहेदा मुल्ला यांचेकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांनी आपल्या शेतातील संत्रा क्षेत्राचे भौगोलिक नामांकन प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन सुभाष नागरे यांनी केलेले आहे.
विदर्भातील नागपुरी संत्र्याचा वैशिष्टपुर्ण गुणधर्म प्रसिद्ध असल्यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रकाश नागरे, डॉ.शशांक भराड यांच्या चमुने विदर्भातील नागपुरी संत्र्याला भौगोलिक नामांकन ५ वषापुर्वी मिळवुन दिले. तद्नंतर संत्रा उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे अपेक्षित होते; परंतु त्यावेळी नोंदणी शुल्क जास्त असल्यामुळे नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. सदरील बाब केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर १००० रुपये भौगोलिक नामांकण आवेदन शुल्क असलेल्या रकमेेेेचे शुल्क केवळ रुपये १० करुन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गेल्या २६ ऑगष्ट २०२० मध्ये सदर राजपत्र प्रसिद्ध केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व विनलेक्सच्या वतीने आयोजित बेविनारच्या माध्यमातुन संत्रा भौगोलिक नामांकनाबाबत डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु यांना श्रमनिधी नागपुरी संत्र्याच्या भौगोलिक नामांकनासाठी आवदन शुल्क रुपये १० सल्लागार फी ३०० रुपये व ४५ रुपये अशा एकुण ३५५ प्रति शेतकरी प्रस्ताव तयार करुन विनलेखनीस कंपनीच्या संचालिका झहिदा मुल्ला यांचेकडे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांचे माध्यमातुन पाठविण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त संत्रा उत्पादकांनी आपल्या शेतातील संत्रा क्षेत्राचे भौगोलिक नामांकन प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन सुभाष नागरे यांनी केलेले आहे.
याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी कृ.अ.सातदिवे, काणे, संगेकर, श्रीराव व श्रमजिवीचे अध्यक्ष निलेश मगर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार, संचालक प्रमोद कोहळे पाटील, सुभाषराव शेळके, विष्णुपंत निकम, राजाभाऊ कुकडे, राजेंद्र कराळे, प्रफुल संबारतोडे, अमोल चोबितकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button