मराठी

गुन्हेगारी पार्श्वभूमी तीनदा जाहीर करण्याचे आदेश

प्रचाराचे नियमही कठोर

पाटणा/दि. १२ – बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी(BIHAR ELECTON) भारतीय निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर प्रचार करण्याचे नियम कठोर केले आहेत. निवडणूक प्रचारात अशा जाहिराती कधी प्रसिद्ध केल्या पाहिजेत व प्रसारित केल्या पाहिजेत, यासाठी आयोगाने अंतिम मुदत दिली आहे. यापूर्वी, निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2018 मध्ये निवडणूक लढविणा-या उमेदवारांना टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी किमान तीन वेळा जाहीर करण्याचे असे निर्देश दिले आहेत.
आता निवडणूक आयोगाने यासाठी अंतिम मुदत निश्चित केली असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या तारखेच्या पहिल्या चार दिवसांत गुन्हेगाराच्या नोंदीची पहिली प्रसिद्धी करण्यात यावी, असे स्पष्टीकरण दिले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या तारखेपासून पाचव्या आणि आठव्या दिवसाच्या आत दुसरी नोंद जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार तिस-या व अंतिम मोहिमेचा नववा दिवस ते दोन दिवस आधी मतदान होण्याच्या आधी म्हणजेच निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या बाबत जाहीर करण्याचे आदेश आहेत. मतदारांना अधिकाधिक माहिती देताना ही अंतिम मुदत पसंतीच्या उमेदवाराची निवड करण्यात मदत करेल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
आगामी बिहार विधानसभा निवडणुका आणि 64 विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेवर पोटनिवडणुकीत येत्या काही दिवसात आपले नशीब आजमावणा-या उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारीच्या इतिहासाविषयी जाहिरात करताना नवीन मुदती पाळाव्या लागणार आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिका-याने सांगितले, की ही मुदत लोकांना जाहिरातींवर लक्ष ठेवण्याची आठवण करून देईल. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने मार्चमध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल करून राजकीय पक्षांना गुन्हेगारीच्या इतिहासासह उमेदवार का बनवितात, हे स्पष्ट करण्यास सांगितले.

Related Articles

Back to top button