मराठी
विद्यानिकेतन सि बी एस ई स्कुल मध्ये ऑनलाइन गीत गायन स्पर्धेचे आयोजन
गणेशोत्सवात आयोजित केले विविध स्तुत्य उपक्रम
धामणगाव रेल्वे दी ३– धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे विद्यानिकेतन सीबीएसई स्कूल (Cbse school) मध्ये गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासून ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित घेण्यात आल्या. व मातीपासून मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली. व नुकतीच गणपती भजन, भक्तिगीत, आरती, गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धां ‘अ’ व ‘ब’ या दोन गटात घेण्यात आली.
-
स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य अमन साचान यांनी केले.
गट ‘अ’ मधून प्रथम क्रमांक निलय बुब , द्वितीय क्रमांक रिया राठी, तृतीय क्रमांक हर्षिता चांदक, व गट ‘ब’ मधून प्रथम क्रमांक श्रुष्टी फरकाडे, द्वितीय क्रमांक डॉली राठी ,तर तृतीय क्रमांक प्रीत वर्मा या विद्यार्थ्यांनी पटकाविला. स्कुलच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून विद्यानिकेतन सि बि एस ई स्कुल ऑनलाईन पद्धतीने विविध कार्यक्रम, उपक्रमाच्या माध्यमातून कार्यशाळा, स्पर्धा, घेण्यात येत आहे. व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमुचे उद्दिष्ट असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री शरदबाबू अग्रवाल यांनी केले. व स्कुलचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी उत्तम कार्य करत असल्याचे मत शाळेचे संचालक राजेंद्र जोशी यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले…कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले…