मराठी

महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले

मुंबई/दि. १  – महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मराठी बांधवांच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळला जातो आहे. आज काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्नाटकमधील मराठी सीमा वासियांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व जुलुम याचा निषेध राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळी फित लावून करत आहेतच शिवाय मंत्रीही निषेध व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राज्यातील जनता सीमा भागात अडकलेल्या लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरू असली तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अत्याचार थांबलेला नाही त्याचाही निषेध करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Back to top button