मराठी

संयुक्त अरब अमिरातीत भारतीयांना मालमत्तेची मालकी

स्थानिक नागरिकांच्या मदतीशिवाय कंपनी आणि घरांचीही मालकी

दुबई/दि.२५  – कोरोनाशी सामना करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती सरकारने (UAE) आपला कायदा बदलला आहे. नव्या निर्णयानुसार आता तेथे व्यवसाय करणा-या परदेशीयांना आता पूर्ण मालकीची परवानगी मिळणार आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागाशिवाय स्वतंत्र मालकी मिळणे सुलभ होणार आहे. टाटा कंपनीला आता तिथे विक्रीची दालने सुरू करता येतील.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीचा विकास कुंठीत झाला होता. त्यातच कोरोनाचे संक्ट आले. त्यातून सावरण्यासाठी संयुक्त अरब अमिराती सरकारने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय घरे आणि व्यावसायिक मालमत्तेची मालकी मिळणार आहे. सुधारित कायदा एक डिसेंबरपासून लागू होणार आहे. परकीयांना पूर्ण मालकी दिली, तर या देशातील गुंतवणूक जास्त होईल. भारताचा टाटा समूह आपल्या दागिन्यांसाठी दुबईत तनिष्क आणि टायटन ब्रँडची दालने सुरू करीत आहे. टायटन कंपनी लिमिटेडच्या इंटरनॅशनल बिझिनेस डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) कुरुविला मार्कोस म्हणाले, की टायटनची या वर्षी 10 पेक्षा जास्त स्टँडअलोन आउटलेट्स उघडण्याची योजना आहे. टेस्लाने 2017 च्या सुरूवातीस दुबईमध्ये पाऊल ठेवले. पलनेही त्याच धर्तीवर आपले स्टोअर उघडले. टाटा समूह तनिष्क आणि टायटन ब्रॅण्डसमवेत संयुक्त अरब अमिरातीत पूर्णपणे मालकीची स्टोअर सुरू करीत आहे.
नव्या परकीय मालकीच्या नियमात बदल केल्याने किरकोळ क्षेत्रात मोठा बदल घडण्याची आशा आहे. लुलू समूहाचे अध्यक्ष युसाफली एम.ए. यांनी नवीन निर्णयाला क्रांतिकारक म्हटले आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होतील असे म्हटले आहे. हा नवीन कायदा अस्तित्त्वात असलेल्या तसेच आगामी व्यवसायांना मदत करेल. या देशाने पुन्हा एकदा सुलभ व्यापारासाठी एक मापदंड स्थापित केला आहे, जो पुढील विकासाच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

 

Related Articles

Back to top button