लंडन/दि. ९ – ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या(Oxford university) सहकार्याने कोरोना लस विकसित करणा-या लंडनमधील औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका‘ला क्लिनिकल चाचण्या थांबवाव्या लागल्या आहेत. ट्रायलमध्ये समाविष्ट असलेली एक व्यक्ती आजारी पडली. त्यामुळ या चाचण्या थांबवाव्या लागल्या. कंपनीने म्हटले आहे, की असे होणे नवीन नाही. रूग्णातील आजाराचे गांभीर्य अद्याप कळलेले नाही. ‘ट्रायलमध्ये जास्त उशीर होणार नाही याची काळजी घेत आहोत,‘ असे कंपनीच्चा वतीने सांगण्यात आले. एस्ट्राजेनेकाने म्हटले आहे, की जर ट्रायलच्या मध्येच एखाद्या स्वयंसेवकामध्ये न समजणारा आजार (Nxpland illness) समोर आला, तर ट्रायल थांबविली जाते. मोठ्या ट्रायल्समध्ये कधी-कधी असे होते; मात्र याचा रिव्ह्यू घ्यावा लागेल. ‘एस्ट्राजेनेका‘ने तिसèया फेजच्या क्लीनिकल ट्रायलसाठी ३० हजार स्वयंसेवकांचे रजिस्ट्रेशन ३१ ऑगस्टपासून सुरू केले होते. एस्ट्राजेनेका त्या ९ कंपन्यांमधील एक आहे, ज्यांच्या व्हॅक्सिनचे ट्रायल तिसऱ्या म्हणजे अखेरच्या टप्प्यात आहेत.