मराठी

फडणवीसांच्या सूचनेला पडळकरांची केराची टोपली

दुधाचा टँकर फोडू नये ...

प्रतिनधि / दि . १ 
सांगली – भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘दूध आंदोलन करावे; परंतु कुठेही दुधाचा टँकर फोडू नये आणि दुधाची नासाडी करू नका’, असे स्पष्ट आदेश राज्यातील सर्व भाजपच्या नेत्यांना दिले होते;. पण उत्साहाच्या भरात भाजपच्या नेत्यांनी सूचनेला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहे. फडणवीस यांचे खास आणि विश्वासू असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. या वेळी पडळकर यांनी कॅन भरून दूध हे गायींच्या अंगावर ओतून सरकारचा निषेध केला. त्यानंतर त्यांनी कॅनमध्ये उरले दूध रस्त्यावर फेकून दिले.

Back to top button