मराठी
एमएचटी-सीईटी परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी सशुल्क बस सेवा उपलब्ध
यवतमाळ/दि.30 – जिल्ह्यात 1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत एमएचटी-सीईटी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील अमृत कॉम्प्युटर इन्स्टीट्युट, समर प्लाझा, ईमारत क्र. 2, साईश्रद्धा हॉस्पीटल समोर, आर्णी रोड, यवतमाळ व जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ या दोन परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जिल्ह्यातून विद्यार्थी येणार आहे. त्यांचेकरिता यवतमाळ एसटी बसस्थानकापासून परिक्षा केन्द्रावर जाण्याकरिता आगार व्यवस्थापक, यवतमाळ यांनी तिकीट शुल्क घेऊन एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.