मराठी

भारताबरोबरचा ताण कमी करण्यासाठी पाकिस्तानने धरले अमेरिकेचे पाय

भारतीय सैन्य ताकद पाहून गर्भगळीत झाला पाकिस्तान

इस्लामाबाद/दि. १२ – लडाखमध्ये भारताने चीनला ज्या प्रकारे उत्तर दिले आणि जगभरातील देशांनी हिंदुस्थानला दिलेला पाठिंबा पाहून पाकिस्तानची तंतरली आहे. भारतीय सैन्य ताकद पाहून गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने आता अमेरिकेचे पाय धरले आहेत.

भारतासोबतचे तणान कमी करण्यासाठी अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी गळ पाकिस्तानने घातली. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव शोहेल महमूद यांनी अमेरिकेचे राजकीय प्रकरणाचे अवर सचिव डेविड हेले यांच्याशी बोलताना पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. भारताच्या वाढत्या सैन्य ताकदीवर qचता व्यक्त करत पाकिस्तानला धोका असल्याचे म्हणत उर बडवून घेतला; मात्र भारताने याआधीच काश्मीर मुद्द्यावर तिसरया पक्षाचा हस्तक्षेप फेटाळला होता, तसेच देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे ठणकावले आहे. यासह जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया बंद करत नाही आणि त्यांना संरक्षण देणे बंद करत नाही, तोपर्यंत द्वीपक्षीय चर्चा शक्य नाही, असेही सांगितले आहे.

याबाबत पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन‘ने दिलेल्या वृत्तानुसार, शोहेल महमूद यांनी दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी आणि काश्मीर वाद सोडवण्यासाठी पावले उचलावी, अशी गळ अमेरिकेला घातली. गेल्या काही दिवसात जम्मू-कश्मीरमध्ये अनेक दहशतवादी आणि कमांडर यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीमेवरही पाकिस्तानच्या आगळिकीला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे. भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक हत्यारांची खरेदी आणि निर्मिती करत असल्याने पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. तसेच काश्मीर मुद्द्यावर तुर्की व्यतिरिक्त अन्य मुस्लिम राष्ट्र आणि सौदी अरेबियानेही साथ न दिल्याने पाकिस्तानने पुन्हा अमेरिकेकडे धाव घेतली आहे. याआधीही पाकिस्तानने अमेरिकेचे पाय धरले होते; मात्र भारताने थेट अमेरिकेला ‘हा द्विपक्षीय मुद्दा असून तिसèया पक्षाचा हस्तक्षेप अमान्य आहे‘, असे सुनावले होते. त्यामुळे यावेळीही पाकिस्तान तोंडावर आपटण्याची चिन्हे आहेत

Related Articles

Back to top button