मराठी

पाक खासदाराने केले अल्पवयीन मुलीशी लग्न

इस्लामाबाद/दि. २३ – खासदार मौलाना सलाहुद्दीन अयुबी 62 वर्षांचे आहेत. त्यांच्यावर 14 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याचा आरोप आहे. तेजमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय-एफ) पक्षाचेखासदार आहेत. आता एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर पोलिस त्याचा तपास करणार आहेत. मुलीच्या वडिलांनीही लग्नाला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानमध्येमुलीच्या लग्नाचेवय 16 वर्षे निश्चित केले आहे. त्याअगोदर लग्न केलेतर कायदेशीररित्या तो गुन्हा मानला जातोआणि शिक्षाही होऊ शकते. मौलान अयुबी बलुचिस्तानमधील चित्राळचेखासदार आहेत. या विषयावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ते मौलाना फजल-उर-रहमान यांच्या पक्षाचेखासदार आहेत. रहमान सध्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीएम) चा नेता आहे. हा मोर्चादेशातील इम्रान सरकारविरूद्ध आंदोलन चालवित आहे. मुलीच्या शाळेनेतिचेजन्म प्रमाणपत्र माध्यमांना दिले. त्यात तिची जन्म तारीख 28 ऑक्टोबर 2006 रोजी आहे. यानंतर एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने पोलिसांत तक्रार दाखल केली. आता याची चौकशी केली जाईल.
गेल्या वर्षीच मौलानाच्या लग्नाचेप्रकरण बाहेर आले होते. त्या वेळी स्थानिक स्थानिक माध्यमांत त्याचे वृत्त आले होते; परंतुमौलाना अयुबी किंवा मुलीच्या कुटुंबाने बोलण्यास नकार दिल्याने याची पुष्टी होऊ शकली नाही. आता स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीची चौकशी केली जाईल. चित्राल पोलिस ठाण्याचे निरीक्षक सज्जाद अहमद यांनी तक्रारीला दुजोरा दिला. याप्रकरणी केवळ तक्रार दाखल केली गेली आहे, की गुन्हा हे त्यांनी सांगितले नाही. पोलिस मुलीच्या घरी पोहोचले आणि तिच्या वडिलांची चौकशी केली. मुलीच्या वडिलांनी आपले पूर्वीचे वक्तव्य बदलले. पोलिसांसमोर मौलानासोबत त्याच्या 14 वर्षांच्या मुलीचे लग्न झाल्याचे त्यांनी नाकारले. स्थानिक प्रशासनाचे अन्य अधिकारी जेव्हा याची माहिती घेण्यासाठी त्याच्या घरी आले, तेव्हा मुलीच्या वडिलांनी त्यांना आश्वासन दिले, की मुलगी 16 वर्षांची होईपर्यंत तिला खासदारांच्या घरी पाठवून देणार नाही.

 

Related Articles

Back to top button