मराठी

गुंडांना हाताशी धरून हल्ल्याची पाकची योजना

आयएसआयच्या प्रयत्नाला सुरक्षा दलांकडून सुरुंग

नवी दिल्ली/दि. २४ – भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने आता नवी चाल खेळली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय(ISI) यासाठी सक्रिय असून आता भारतातल्या गँगस्टर्स आणि गुंडांना हाताशी धरून हल्ले घडवून आणण्याची योजना आखत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतल्याने त्यांचे कंबरडे मोडले असून आता नवा डाव पाकिस्तान खेळत असल्याची माहिती आहे.
स्थानिक गुंड आणि गँगस्टर्स यांचे स्थानिक पातळीवर नेटवर्क असते. त्या नेटवर्कचा उपयोग करून घातपात घडविण्याची ही योजना आहे. पंजबामध्ये यासंबंधातल्या काही घटना उघडकीस आल्याने गुप्तचर विभागाने सर्वच स्तरावर याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. यातले अनेक गँगस्टार्स हे फरार आहेत किंवा काही जेलमध्ये आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क स्थापन करण्याचे काम दहशतवादी करत असून त्यांची मदत घेत घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या गुंडांना पैशांचे आमिष दाखखवून त्यांच्याकडून हे काम करून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेटवर्कचा वापर करून दहशतवादी घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राजधानी दिल्लील्या धौलाकुआं भागातून अटक केलेल्या आयएसआयएसच्या दहशतवादाच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला आहे. या स्फोटकांचा वापर करून दिल्लीला दहशत पसरविण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी अबू यूसुफ उर्फ मुस्तकीम याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे घातले त्यात हा शस्त्रसाठा सापडला आहे.
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत असून त्यातून अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर येत आहेत.

टायमर बाँब जप्त

पोलिसांनी धाडी टाकून जेव्हा हा साठ जप्त केला तेव्हा त्यांना ही धक्कादायक गोष्टी समजली. दिल्लीत एकाच वेळी दोन स्फोट घडविण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने दोन प्रेशर कुकरही आणलेले होते. त्यात 5 किलो स्फोटकं भरून त्याचा बॉम्ब करण्यात आला होत. त्याला टायमरही लावण्यात आले होते. त्यामुळे हा कट मोठा होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button