मराठी

पंचायत समितीच्या गोडावुनमध्ये चोरी करणारे अटकेत

वरुड पोलिसांनी अवघ्या काही तासात उघडकीस आणली चोरी

वरुड प्रतिनिधी। १ नोव्हेंबर – पंचायत समितीच्या गोडाऊनमधून शिलाई मशिनचे पायदान चोरुन नेणा:या ३ गावठी चोरट्यांना वरुड पोलिसांनी काही तासांच्या आंतच अटक केल्याने वरुड पोलिसांचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे.
याबाबत प्राप्त माहीतीनुसार, शहरातील विश्रामगृहा नजीक असलेल्या पंचायत समिती कार्यालयासमोरच पंचायत समितीचे शासकीय गोडाऊन असून या गोडाऊनमध्ये वेगवेगळया प्रकारच्या लाभाथ्र्यांना वाटप करावयाचे साहित्य ठेवण्यात येते. जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या शिलाई मशिनचे ३३ पायदान याच गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते. आज सुटीचा दिवस असल्यामुळे आणि पंचायत समिती परिसरामध्ये कोणीही येणार नसल्याची संधी गावठी चोरट्यांनी साधली आणि सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान गोडावुनचे कुलूप तोडून गोडावुनमधील ३३ शिलाई मशिनचे पायदान चोरट्यांनी लंपास केले.
त्याच कालावधीमध्ये बाजुलाच असलेल्या सलुन दुकानाचे मालक त्या परिसरात लघुशंकेसाठी गेले असता गोडाऊन उघडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यामध्ये चोरी झाल्याचे शिपायाच्या निदर्शनास येताच त्यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिका:यांना माहीती दिली. त्यानंतर पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक देवेंद्र प्रल्हाद जिचकार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आणि आय.पी.एस.नवनियुक्त ठाणेदार श्रेणीक लोढा यांनी तातडीने वेगवेगळया ३ टिम तयार करुन चोरट्यांना शोधून काढण्याचे फर्मान सोडले.
ठाणेदार श्रेणीक लोढा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमंत चौधरी, जमादार नाजुकराव खंडारे, सुरेश गावंडे, गजानन गिरी, शेषराव कोकरे, सागर लेव्हरकर, मिलिंद वाटाणे यांनी गुप्त माहीतीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला. अवघ्या काही तासातच चोरट्यांना मुद्देमालासहीत ताब्यात घेतले.
या प्रकरणात प्रफुल पाटणका, राहूल पाटणकर रा.शहापूर (पुनर्वसन), रामकिशोर सिरसाम रा.मिरची प्लॉट, वरुड यांना ताब्यात घेतले असून त्यांचेजवळुन चोरीला गेलला मुद्देमाल सुध्दा जप्त केला आहे.या गावठी चोरांच्या अटकेमुळे आणखी काही चो:या उघडकीस येतात काय? याचा शोध वरुड पोलिस घेत आहेत.
वरुड पोलिसांनी काही तासांच्या आंतच अटक केल्याने वरुड पोलिसांचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे.

Related Articles

Back to top button