मराठी

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावाही आॅनलाईन

मुंबई/दि.२२  –  दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भगवान गडावर भव्य असा दसरा मेळावा घेत असतात; मात्र यंदा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी परिस्थिती नाही. या काळात पंकजा मुंडे दसरा मेळावा कसा घेणार असा प्रश्न अनेकांना होता. आता पंकजा यांनी फेसबुकद्वारे याविषयी माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पंकजा यांनी फेसबुकवरुन व्हिडिओ शेअर करत समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या दसऱ्याला वेगळ्या सीमोल्लंघनाचा निश्चिय करू. नवीन सीमोल्लंघनासाठी सर्व जणांनी तयार व्हा, असे आवाहन पंकजा यांनी केले आहे.
फेसबुकद्वारे संवाद साधत पंकजा  म्हणाल्या, की दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट बघत असता. मीदेखील या मेळाव्याची वाट पाहते. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली आहे, ती पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे; मात्र यंदा राज्यावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाची परिस्थितीमुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करणार आहोत. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांनी नतमस्तक व्हा. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येने हा कार्यक्रम करायचा आहे.

Related Articles

Back to top button