मराठी
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांना पितृशोक
अमरावती दी ४- शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांचे वडील बलदेवराव खराटे यांचे शुक्रवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. विद्युत महामंडळातून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले बलदेवराव खराटे यांचा विविध सामाजिक संस्था व संघटनांसोबत निकटचा संबंध होता. सामाजिक व धार्मिक कार्यात ते नेहमी सक्रिय राहत होते. काही महिन्यांपासून ते आजारी होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुनील, अनिल व दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे. शुक्रवारी रात्री स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी गणमान्य नागरिकांनी श्रध्दांजली अर्पण केली.